Immunity Score

कोरोना तिसरी लाट : लहान मुलांसाठी धोकादायक

अशी बातमी ऐकून आपण अधिकच घाबरून गेलो आहोत पण आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत हा आजार घाबरण्याचा किंवा काळजी करण्याचा नसून काळजी घेण्याचा आहे,

सर्वात महत्वाचे या आजारात महत्व आहे ते *प्रतिकार शक्तीला* .

कोरोना जरी झाला तरी 85% लोकांना काही त्रास होत नाही याचे कारण प्रतिकार शक्ती चांगली असणे होय. प्रतिकार शक्ती कश्यावर अवलंबून आहे तर ती तुमच्या पचनशक्तीवर आणि  ,*पचनशक्ती चांगली रहाण्यासाठी आपला आहार, व्यायाम व झोप* खूप महत्त्वाची आहे ,

*लहान मुलांची दिनचर्या कशी असावी*

*लहान मुलांची दिनचर्या खालील प्रमाणे*:

  • सकाळी लवकर उठावे
  • उठल्यावर आयुर्वेदिक दंतमंजनाने दात घासावे.
  • कवल चूर्ण टाकून पाण्याने गुळण्या करा
  • जिव्हा निर्लेखन ने जीभ स्वच्छ घासा
  • घाम निघेल असा व्यायाम करा, सूर्यनमस्कार ,सांध्यांच्या हालचाली ,कवायती योगासनेकरावीत
  • अभ्यंग तेलाने मालिश करावी (अंगाला तेल लावावे)
  • कोमट पाण्याने अंघोळ करा
  • अंघोळ करताना उटणे,मसूर डाळ, हळद, आयुर्वेदिक उद्वर्तन यांचा वापर करावा
  • नीम, ओवा ,वेखंड ,बाळंतशेपा ,वावडिंग ,देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ,भीमसेनी कापूर वापरून धूपन / धुरी कराव्या
  • ओंकार ,मेडिटेशन ,विश्वप्रार्थना म्हणावी
  • सकाळी नाष्ट्या ऐवजी जेवण पोळी भाजी भात वरण
  • दुपारी भूक लागल्यास हलके पदार्थ घ्यावे (भात वरण तूप लिंबू)१ घास ३२ वेळा चावून खावा .दर 2-4 घासाला घोटभर पाणी(जेवणाच्या मधेमधे)
  • संध्याकाळी वा रात्री लवकर हलके सुपाच्य जेवण (मुग डाळ तांदूळ खिचडी, भात वरण इ)
  • संध्याकाळी दिवा लावताना तीळ तैल वापरून दिवा लावावा, शुभंकरोती इ प्रार्थना म्हणाव्यात
  • रात्री ८ नंतर टिव्ही मोबाईल व डोळ्यावर प्रखर प्रकाश पडेल अश्या गोष्टी बंद कराव्या
  • जेवणानंतर दंतमंजन व गुळण्या करणे
  • सकाळी उपाशीपोटी  दूध-तूप घ्यावे.( कफाचा त्रास, अपचन असणाऱ्यानी घेऊ नये किंवा आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)
  • रात्री झोपताना नाकात साजूक तूप ,डोळ्यात तूप ,तळहात तळपाय टाळू ला तूप लावावे
  • १० वाजता झोपताना देवाचे नामस्मरण

*इम्युनिटी चांगली राहण्यासाठी लहान मुलांना काय देऊ नये*

  • प्रोटिन पावडर ,चोको ,कुरकुरे, केक, बिस्किट ,
  • चॉकलेट सॅण्डविच, पिझ्झा, बर्गर चायनीज,
  • बर्फ, आइस्क्रिम .
  • आंबवलेले, बाहेरचे, शिळे, उघडयावरचे
  • शेव, फरसाण, तळलेले
  • नाष्ट्याला ओटस, कॉनफ्लेक्स, चहापोळी, दुधपोळी, चहाबिस्किट, चहा-खारी-बेकरी

दुध व विटा इ पावडर-ग्रानुल्स, मिल्कशेक, शिकरण, मॅगी, इडली ,डोसा ,ढोकळा, इन्स्टन्ट बनवलेले, बाहेरचा समोसा ,वडा, भजी, भेळ मिसळ

  • सॉस, जॅम देऊ नये

*आपली इम्युनिटी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आमचा इम्युनिटी स्कोर Immunity Score हा फॉर्म भरावा*

मुलांसाठी for Children – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdBzcW-LOhjKLsly1nl-BPtogUFBIPjC-7eYdQDdIWKM33w0A/viewform

मोठ्यांसाठी For Adults – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfUaaFs4nWJtX3dNsm6IHW1dtc6MVKFe1AZL8ytZ9CePITo6g/viewform

*अत्यंत कमी इम्म्युनिटी असणाऱ्या मुलांसाठी विशेष ऑनलाईन तपासणी सल्ला सुविधा उपलब्ध संपर्क* 8779584840 / 9869105594

*लहान मुलांसाठी अमृता आयुर्वेद स्पेशल इम्युनिटी किट, सुवर्ण प्राशन, अमृत कल्प इ  पार्सल , कुरियर ( भारतात कुठेही ) ,होम डिलिव्हरी सेवा उपलब्ध*

वैद्य आनंद कुलकर्णी, वैद्या अमृता कुलकर्णी

एम ड़ी  आयुर्वेद

आयुर्वेद हा अमृताप्रमाणे आहे, आयुर्वेद हेच अमृत आहे.

*अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर*

A2/305,नागेश टोवर, हरिनिवास, नौपाडा, ठाणे प

संपर्क:

8779584840 / 9869105594