*हास्य (laughing), विनोद (Jokes), आनंद (Happiness)* या तात्पुरत्या गोष्टी आहेत असे कोणीही समजू नये. या गोष्टी फार महत्वाच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या असून आरोग्य शास्त्र दृष्ट्या त्यांचा उपयोग व महत्व खूप आहे. फुलांचा बहार आल्यावाचून झाडांचे व आनंद वृत्ती (Happy) झाल्याशिवाय बालक (लहान मुले) यांची तब्बेत, जीवनसौंदर्य, शारीर-मानसवाढ योग्य व्यक्त होत नाही, सफल होत नाही. म्हणून *आपल्या मुलांना आनंदी राहण्यास आणि योग्य प्रसंगी मनमुराद हसण्यास उत्तेजन देत रहा* (योग्य विनयशील राहून, त्याचे अतिक्रमण न करता) मोठ्याने पोटभर हसल्याने छाती विस्तृत होते, ऑक्सिजन भरपूर मिळतो, हृदयातून रक्तसंचार शरीरभर स्वाभाविक , सहजसुलभ वेगाने चालू राहतो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे शरीर आणि मनाची *प्रतिकारशक्ती (Immunity)* चांगली टिकून राहते, सध्याच्या काळात कोणत्याही रोगाशी यशस्वी लढा देता येतो. – डॉ आनंद कुलकर्णी अमृता आयुर्वेद ठाणे 8779584840 अमृता आयुर्वेदची Website – *www.amrutaayurved.in* Facebook page – https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter/ आयुर्वेद माहितीपर लेखांसाठी, टिप्स साठी ग्रुप ची लिंक खालील प्रमाणे *Link for Joining the group for Ayurved Tips* https://chat.whatsapp.com/BnqJF44r3TPHgj5LjNoCSf