Ayurvedic Detoxification, शरीरशुद्धी आणि इम्युनिटी Immunity

सध्याची अतिशय चर्चेची गोष्ट म्हणजे इम्युनिटी आणि इम्युनिटी म्हणजे रोगाशी लढण्याची शक्ति.

रोग होऊ न देण्यासाठी रोग होण्यापूर्वीच शरीरात अशी परिस्थिती निर्माण करायला पाहिजे ज्यामुळे पुढे होणाऱ्या रोगापेक्षा आपल्या शरीराची ताकद जास्त असायला हवी.

अशी परिस्थिती, वातावरण निर्मिती करता येईल का?
– होय,
अशी निरोगी / आरोग्यपूर्ण शारीरिक स्थिती निर्माण करता येऊ शकते.

यासाठी प्रथम शरीर बलवान पाहिजे आणि दुसरे म्हणजे शरीरात किंवा शरीराबाहेर त्रास देणारे घटक कमी असले पाहिजेत

पहिल्या प्रकारासाठी आयुर्वेदात रसायन चिकित्सा सांगितली आहे, आणि दुसऱ्या प्रकारासाठी शोधन म्हणजे पंचकर्म चिकित्सा सांगितली आहे.

शरीराची योग्य साफसफाई (आतून बाहेरून) ठेवल्यास कचऱ्यावर (अंतर्बाह्य दोन्ही) जगणारे जीवजंतू आणि रोग हे होणार नाहीत हे साधे सरळ सत्य आहे

आता आपण बाहेरून शरीर साफ ठेवतोच , पण आतून ते साफ ठेवण्यासाठी काय करावे लागेल?

शरीरामध्ये तीन दोष (वात, पित्त, कफ), सात धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा,शुक्र) आणि तीन मल (मल, मुत्र, स्वेद-घाम) असतात

यापैकी तीन दोष हे बिघडले की बाकीच्यांना दूषित करतात.
या दोषांना आपण योग्य प्रमाणात ठेवले म्हणजे कमी किंवा जास्त होऊ दिले नाही की बाकीचे घटक समतोल राहून आरोग्य टिकून राहते.

या दोषांचा समतोल राखण्यासाठी, आपल्या दैनंदिन जीवनात विविध गोष्टी मुळे जी दोषदुष्टी होऊन शरीरात त्यांचा साठा व्हायला लागतो तो नष्ट करण्यासाठी – तो विकृत साठा साफ करण्यासाठी शरीराची वर्षातून त्या त्या वेळी साफसफाई म्हणजेच शुद्धी करणे आवश्यक असते उदाहरणार्थ जसे रोज आपण आपले घर साफ करतच असतो पण दिवाळी, दसरा इ साठी आपण तेच घर साफ करायला घेतल्यावर आणखी कानाकोपऱ्यातील जाळ्या जळमटे इ विविध कचराही निघतो तसे शरीरातही दोषदुष्टीचा साठून राहिलेला कचरा हा धुवून काढणे , साफ-स्वच्छ करणे, म्हणजेच शरीर शुद्ध करणे होय, यामुळे आपल्या नकळत आरोग्याच्या तक्रारी निर्माण करण्यास कारण असलेल्या गोष्टी आपोआपच नष्ट होऊन जातील व आरोग्य टिकून राहील.

आता ही शरीरशुद्धी कशी करता येईल?

क्रमशः