9) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 9
*अपामार्ग – (Achyranthes aspera)*
अपामार्ग म्हणजे आघाडा.
– आघाडा शिरोविरेचन (डोक्यातील दोषांचे शोधन) करणारा आहे. त्यामुळे कफरोगांमध्ये आघाडयाच्या बियांच्या चुर्णाचे नस्य देतात
– डोळ्यांच्या रोगांमध्ये याच्या मुळांचे अंजन करतात
– कर्णरोगात अपामार्गक्षारसिद्ध तेलाचे कर्णपूरण करतात.
– आघाड्याच्या बिया पचायला जड असतात त्यामुळे भस्मक (अति भूक लागणे, सारखे खा-खा करणे ) रोगात यांची खीर बनवून दिली जाते.
– अपामार्ग मूत्रल , अश्मरीनाशन आणि मूत्रातील अम्लतानाशक आहे. त्यामुळे मूत्राशय वा किडनीला आलेली सूज,खडे यामध्ये खूप उपयोगी आहे.
– दोषांचे मार्जन म्हणजेच दोषांना स्वच्छ करणारा अपामार्ग होय. अपामार्ग कफवातशामक आहे,
कफ पातळ करणारा आहे त्यामुळे खोकला-दमा यासारख्या आजारात वापरतात.
– याचा क्षार पोटातून दिल्यास त्वचा, फुफ्फुस, यकृत व पित्ताद्वारा उत्सर्ग होतो त्यामुळे त्वचारोग, श्वसन संस्थेचे आजार, पित्तविकार, पोटाचे आजार, पित्ताचे खडे अश्या विकारात प्रभावीरित्या वापरले जाते.
– त्वचेवरील खाज याच्या काढ्याने परिषेक केल्याने कमी होते
– याचे चूर्ण किंवा राख दात घासण्यासाठी वापरल्यास दात किडत नाहीत
– हृदय रोगातही आघाडा खूप उपयोगी आहे
– थंडी वाजून येणाऱ्या तापावर याच्या पंचांगाचा काढा वापरतात
– *अपामार्ग उष्ण असल्याने पित्त वाढवतो त्यामुळे पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी जपून वापरावे किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन वापरावा*
– *अशा अत्यंत उपयोगी असलेल्या औषधी वनस्पती आपण आपल्या परिसरात नक्की लावल्या पाहिजेत*
गणपतीस ही पत्री वाहण्याचा
मंत्र – गुहग्रजाय नमः। अपामार्गपत्रं समर्पयामि ।।
*गणपती बाप्पा मोरया*
– क्रमशः
– *डॉ आनंद कुलकर्णी*
*अमृता आयुर्वेद, ठाणे*
8779584840
Website – *www.amrutaayurved.in*
Facebook page – https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter/
आयुर्वेद माहितीपर लेखांसाठी ग्रुप ची लिंक खालील प्रमाणे
Link for Joining the group for Ayurved Tips
https://chat.whatsapp.com/BnqJF44r3TPHgj5LjNoCSf