7) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 7
*तुळस (तुलसी) – (Ocimum sanctum)*
तुळस ही सर्वांच्या अत्यंत परिचयाची अशी वनस्पती आहे.
बहुतेक सर्वांकडे सर्दी-खोकला झाल्यावर ताज्या तुळशीच्या पानांचा रस काढून त्यात मध मिसळून चाटण केले जाते. असा घरगुती उपाय केल्यास तो आजाराच्या सुरुवातीच्या टप्यात तरी नक्की उपयोगी पडतो
– पूर्वी अडूळसा, ज्येष्ठमध यांचा तुळशीसोबत घरीच काढा करून घेतला जात असे
– कफाचा जोर जास्ती असताना अनेक औषधाच्या बरोबरीने तुळशीचा रस घेतला जातो
– उलटीमधून कफ पडत असताना तुळशीच्या पानांचा रस मधाबरोबर घ्यावा
– तुळस ही रक्त शुद्धीकर आहे म्हणून अनेक रक्ताविकारातही वापरतात
– तुळस ही हृदय म्हणजे हृदयाला बळ देणारी आहे
– तापामध्ये हिवताप, सर्दी खोकला, अंगदुखी यामध्ये तुळशीचा रस हा मिरपूड आणि मधाबरोबर द्यावा म्हणजे लवकर गुण येतो
– तुळशीमुळे जीभ स्वच्छ होते, आमाचे पचन होते, भूक चांगली लागते
– जुनाट अतिसार यामध्ये तुळशीच्या बियांची खीर दिल्यास उपयोग होतो
– त्वचाविकारांमध्ये खाज कमी होण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस लावला जातो
– जंतुघ्न असल्याने बाह्यकृमींवर जखम धुण्यासाठी पानाचा रस उपयोगी पडतो
– जेथे त्वचेमध्ये बधिरपणा आहे, स्पर्श ज्ञान कमी आहे तेथे पानांचा रस चोळावा म्हणजे जाणीव सुधारते
– हिरड्याच्या सुजेतही पाने चावून खाल्यास सूज कमी होऊन पुयही कमी होण्यास मदत होते
– सामान्य दौर्बल्य / थकवा weakness असताना तुळशीच्या बियांची खीर खावी म्हणजे शक्ती येते
– तुळशीच्या बियांचे सरबत मूत्रविकारामध्ये उपयोगी पडते
– तुळशीजवळ मलेरिया इ चे डास येत नाहीत म्हणून घराभोवती तुळशीची झाडे लावल्यास त्याचा खूप उपयोग होतो
अशी ही बहुगुणी औषधी वनस्पती गणपतीला पत्री म्हणून वाहण्यात येते
ही पत्री गणपतीस वाहण्याचा
मंत्र – गजकर्णाय नमः। तुलसीपत्रं समर्पयामि ।।
– *अशा अत्यंत उपयोगी असलेल्या औषधी वनस्पती आपण आपल्या परिसरात नक्की लावल्या पाहिजेत*
*गणपती बाप्पा मोरया*
– क्रमशः
– *डॉ आनंद कुलकर्णी*
*अमृता आयुर्वेद, ठाणे*
8779584840
Website – *www.amrutaayurved.in*
Facebook page – https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter/
आयुर्वेद माहितीपर लेखांसाठी ग्रुप ची लिंक खालील प्रमाणे
Link for Joining the group for Ayurved Tips
https://chat.whatsapp.com/BnqJF44r3TPHgj5LjNoCSf