6) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 6

*धत्तूर – (Dhatura metel)*

धत्तूर म्हणजेच धोत्रा होय.
धत्तुर हे विषारी असल्याने त्याची शुद्धी करून वापरावे लागते

– बाहेरून वापर करण्यामध्ये चाई वर याच्या पानांचा रस चोळावा (डोळे इ इंद्रिये सांभाळून)

– शुद्ध धत्तुर वेगवेगळ्या पोटदुखी मध्ये फार छान काम करतो

– कफाचे शोषण करून अवरोध दूर करून मार्ग मोकळे करत असल्याने श्वास दमा लागणे या चिकित्सेत धत्तुराला महत्वाचे स्थान आहे

– कफाचा स्राव कमी करणारे आह,श्वासनलिका विस्फारक आहे यासाठी TB, दमा यासारख्या आजारांतही वापरतात.

– थंडी वाजून येणाऱ्या तापात धत्तुर हमखास उपयोगी पडतो

– कुत्र्याच्या विषावर धत्तुर वापरतात

– मार लागून आलेल्या सुजेवर पानांचा रस लावता येतो

– त्वचाविकारांमध्ये खाज कमी करण्यासाठी उपयोग होतो

– सांध्येदुखी इ मध्ये वेदना शमन करण्यासाठी विविध वात विकारात हे वापरले जाते.

– यामध्ये असणारी रसायने मुख्यत्वे पेरीफेरल नर्वस सिस्टमवर कार्यरत असलेल्या एसिटाइलकोलीन या प्रक्षेपकाच्या विरोधी कार्य करतात. यातील अट्रोपिन डोळ्यांतील बुब्बुळ विस्फारक असतात. शरीरात गेल्यास ते पटकन शोषले जाते. अपरेद्वारा (प्लेसेंटा) गर्भापर्यंतसुद्धा पोहोचते.याचा शरीरातून उत्सर्ग मूत्र तसेच स्तन्याद्वारे होतो त्यामुळे गर्भिणी व स्तनपान करणाऱ्या महिलांनी खबरदारी घ्यावी.

त्यामुळे वैद्यकीय कारणांसाठी वापरताना वैदयांच्या सल्ल्याशिवाय वापर करू नये.

सध्याच्या काळातील सर्दीच्या, तापाच्या, डोकेदुखीच्या रुग्णांमध्ये धत्तुर वापरून उत्तम गुण येतो

असा विषारी पण बहुगुणी धत्तुर गणपतीला पत्री म्हणून वाहण्यात येतो

गणपतीला ही पत्री वाहण्याचा
मंत्र – हरसुनवे नमः । धत्तूरपत्रं समर्पयामि।।
*गणपती बाप्पा मोरया*
– क्रमशः
– *डॉ आनंद कुलकर्णी*
*अमृता आयुर्वेद, ठाणे*
8779584840
Website – *www.amrutaayurved.in*

Facebook page – https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter/
आयुर्वेद माहितीपर लेखांसाठी ग्रुप ची लिंक खालील प्रमाणे
Link for Joining the group for Ayurved Tips
https://chat.whatsapp.com/BnqJF44r3TPHgj5LjNoCSf