5) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 5 – बदर
*बदर – (Ziziphus jujube)*
बदर म्हणजे बोर होय.
– बोराचे फळ, पान ही औषधी आहेत, त्यांचा उपयोग प्लिहा (स्प्लिन spleen) वाढली असता करता येतो
– तहान जास्ती लागत असल्यास बोरे खावीत म्हणजे आराम वाटतो
– बोराचे फळ हे हृद्य म्हणजे *हृदयासाठी हितकर, बल्य, बल देणारे* असे आहे.
– पोट साफ राहण्यासाठीही बोर खूप छान मदत करते
– तोंडाला चव नसणे, भूक कमी होणे, पोट फुगणे, मलावरोध अशा तक्रारीमध्ये बोराचा वापर करावा
– पित्तामुळे किंवा ज्वरामुळे शरीराची आग होत असेल तर बोराच्या फळांचा रस प्यायला देतात.
– बोराचे फळ बृहण, पोषण करणारे, बलदायी सांगितले आहे. त्यामुळे कुपोषण, दौर्बल्य, वजन कमी असणे यामध्ये बोरे उपयोगी ठरतात.
त्याच्यामध्ये विविध विटामिन्स (सी,बी12,बी6) मिनरल्स(लोह,सोडियम, पोटेशियम आणि कॅल्शियम) आहेत.
– तसेच रोगप्रतिकारक शक्तिही सुधारते.
– गळवांवर बोराच्या पानांचा लेप करतात. लवकर बरे होण्यास मदत होते.
– *अशा अत्यंत उपयोगी असलेल्या औषधी वनस्पती आपण आपल्या परिसरात नक्की लावल्या पाहिजेत*
गणपतीला ही पत्री वाहण्याचा मंत्र – लम्बोदराय नमः । बदरीपत्रं समर्पयामि।।
*गणपती बाप्पा मोरया*
– क्रमशः
– *डॉ आनंद कुलकर्णी*
*अमृता आयुर्वेद, ठाणे*
8779584840
Website – *www.amrutaayurved.in*
Facebook page – https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter/
आयुर्वेद माहितीपर लेखांसाठी ग्रुप ची लिंक खालील प्रमाणे
Link for Joining the group for Ayurved Tips
https://chat.whatsapp.com/BnqJF44r3TPHgj5LjNoCSf