काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 24
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
पेअर –
महाराष्ट्रात याच फळाला नाश्पती किंवा नासपाती असेही म्हणतात. आकाराने पेरू सारखे दिसणारे हे फळ बाजारात आज भरपूर बघायला मिळते. याची साल थोडीशी हिरवट पिवळ्या रंगाची असते. याची चव आंबटगोड असून पिकल्यावर एक विशिष्ट प्रकारचा वास या फळाला येतो.
पेअर फळ –
- पेअरचे कच्चे फळ याचा उपयोग जुलाबामध्ये विशेषतः जेव्हा जुलाब पातळ, भसरट, आणि वारंवार होत असतील तेव्हा होतो. याबरोबरीने दुसरा कोणताही आहार घेऊ नये. किंवा वैद्याचा सल्ला घेऊन उपयोग करावा.
- अतिशय तहान लागणे, पोटात जळजळ होणे, भूक मंद होणे, पोट फुगून तडस लागणे इ पोटाच्या तक्रारींमध्ये पेअराचे फळ अत्यंत उपयोगी पडते. अशावेळी जेवणाच्या बरोबर पेअरचे तुकडे खावे.
- पित्ताशयात खडे होणे अशी सवय असणार्यांनी पेअरचा अवश्य उपयोग करावा. अशा वेळी पेअर अनशापोटी खावे आणि नंतर दोन तास काहीही खाऊ नये. या उपायाने पित्त स्त्रवण दुष्टी जावून वरील सवय जाण्यास चांगली मदत होते.
- तसेच लघवीचे खडे होण्याची सवय असणार्यांना सुद्धा वरील प्रयोग फायदेशीर ठरतो. ( पित्ताश्मरी किंवा मुत्राश्मरी या दोन्हींमध्ये आयुर्वेदीय वैद्याचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक असते , वरील प्रयोग वैद्याच्या सहमतीनेच करावा.)
- हिरड्यातून रक्त येणे, दात हिरड्या शिवशिवणे, जिभेवर पांढरा थर जमा होणे यासारख्या तक्रारींमध्ये पेअरचे फळ चावून खावे.
- पेअरचे सरबत किंवा आसव अरिष्ट सुद्धा करता येते.
- पेअराचे आसव अरिष्ट ( वैद्याचा सल्ला घ्यावा. ) घेण्याने भूक न लागणे, जेवण न जाणे इ तक्रारी नाहीशा होतात.
- अन्न न पचणे, पोटात गॅसेस होणे यासाठी वरील आसव जेवणाच्या मध्ये मध्ये घ्यावे.
- जास्ती कष्ट सहन न होणे, थोड्याशा श्रमाने अंग दुखणे काहीही न करता बसून रहावेसे वाटणे अशा तक्रारींमध्ये वरील आसव हे काहीतरी खाल्यानंतर घ्यावे.
- मुत्रास जळजळ, उष्ण, पिवळी होत असल्यास वरील आसव खडीसाखरेबरोबर घ्यावे म्हणजे फायदा होतो.
सावधानता –
- सर्दी – खोकला वारंवार होणार्यांनी पेअर खाणे टाळावे.
- मधुमेही रुग्णांनी पेअर खाऊ नये.
- पेअर आणि दुध किंवा पेअर आणि इतर फळे एकत्र खाऊ नये.
–क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchakarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –