काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 15
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
आंब्याची पाने –
कोणत्याही मंगल कार्यामध्ये आंब्याच्या पानांचे तोरण करण्याची पद्धत आपल्याकडे आहे
यामुळे घरामध्ये अशुभाचा प्रवेश होत नाही असे मानले जाते. पानेसुद्धा चवीला तुरट असतात.यांचा वापर जुलाब, आव पडणे यामध्ये होतो. कोवळी पाने चावून नंतर थुंकून दिल्यास घशाला फायदा होऊन आवाज सुधारतो. पडजीभ वाढून येणाऱ्या खोकल्यामध्ये या पानांचा चांगला उपयोग होतो. वाळलेल्या पानांचा धूर दिल्याने उचकी कमी होते. जखम बरी होण्यास जाळलेल्या पानांची राख खोबरेल तेलामध्ये लावावी. याने जखमेची आग कमी होते तसेच भाजण्याने होणारी आगही याने कमी होते.
आंब्याची अंतर्साल –
तोंड येत असल्यास याच्या काढ्याने गुळण्या कराव्यात, त्रास कमी होतो.
आंब्याचा डिंक –
आंब्याचा झाडाचा डिंक हा लचक भरणे, उसण भरणे, पाय मुरगळणे, इ प्रकारात उपयोगी
येतो. त्यासाठी आंब्याचा डिंक एरंडेल तेलात हळद घालून गॅसवरती गरम करून त्याचा लेप
करावा.
अशा प्रकारे वरीलप्रमाणे सर्वतोपरी कल्पवृक्षासारखा प्रत्येक अंगाचा उपयोग असणारा असा
हा आंबा होय. त्याचप्रमाणे या आंब्याच्या फळाच्या रसापासून केलेले आंबाबर्फी, आंबापोळी,
आंब्याचे सरबत इ अनेक प्रकार बाजारात पहायला मिळतात. यांच्या वापराने अति उत्तम
स्वास्थ्याचा लाभ होतो. तसेच मनही प्रसन्न होते. उन्हाळ्यात या फळाच्या सेवनाने उन्हाची
तीव्रता कमी प्रमाणात जाणवण्यास मदत होते. असा हा बहुगुणी आंबा प्रत्येकाने जरूर खाऊनत्याच्या गुणांचा अनुभव घ्यायलाच हवा. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी बिनधास्त पणे आंबा खाण्यासाठी आयुर्वेदीय वैद्याचा सल्ला अवश्य घ्यावा.
आता पुढील फळाविषयी जाणून घेऊया.
लिंबू –
आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये या फळास दन्तशठ असेही म्हणलेले आढळते. ‘ ऐरावतं दंतशठं
अम्लं ……’ अशा प्रकारचा उल्लेख सापडतो. म्हणजे हत्तीचे सुद्धा ( ऐरावत हत्ती ) दात या
फळाने आंबतात तर इतरांची काय कथा ?. असे हे अत्यंत आंबट असणारे फळ होय. लिंबाचे
फळ हे दोन प्रकारचे असते. एक गोल, पातळ – पिवळ्या सालीचे असे असते. यासच कागदी लिंबू ( lime ) असेही म्हणतात. व दुसरे लांबट, जाड व हिरवी साल असलेले असे ( Lemon ) असते. पहिले औषधासाठी वापरतात व दुसरे लोणची, सरबते इ साठी वापरतात. गुणांनी व आंबट रसाने दोन्हीही प्रकार साधारणपणे सारखेच असतात. ही फळे चवीला अत्यंत आंबट असतात. या लिंबाच्या सालीचा, रसाचा, ‘बी’चा , पानांचा औषधासाठी वापर होतो.
-क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchakarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –