काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 13
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
आंबा –
आजकाल आंबा पिकवण्यासाठी जे केमिकल्स वापरले जातात ते आरोग्यास फार हानीकारक असतात. त्यामुळे नुसते पिवळे झालेले व स्पर्शास कच्चे आंबे शक्यतो खाऊ नयेत. नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबेच खाणे योग्य होय. त्यासाठी गावी / ओळखीच्या ठिकाणाहून आंबे घेणे श्रेयस्कर होय. बाजारातून आंबा घरी आणल्यानंतर नळाखाली स्वच्छ धुवून घ्यावा. तसेच तासभर पाण्यात बुडवून ठेवावा व नंतर खावा. म्हणजे त्याच्यावरील रसायने निघून जातात.
- आंबा खाल्याने शरीराला शक्ती येते, पचन सुधारते, भूक वाढते, तोंडास रुची येते, पोट साफ होते, मनही प्रसन्न होते.
- डोळ्यांच्या विविध तक्रारींवर आंबा हा उत्तम गुणकारी होय. डोळ्यांची आग होणे, बुबुळे दुखणे, डोळे कोरडे पडणे, रात्रीचे वेळी त्रास होणे या तक्रारींवर आंबा उपयोगी पडतो.
- छाती, फुफुस इ च्या तक्रारींवर, वारंवारच्या सर्दीवर, खोकल्यावर उपाय म्हणून आंबा खावा. व याच्याबरोबर काळी मिरी व सैंधव खावे.
- वजन वाढवण्याचा हमखास उपाय म्हणजे नियमित आंबा खाणे होय. दररोज एक आंबा खावा. वरून दुध प्यावे. जेवणात गाईच्या तुपाचा वापर ठेवावा.
- बाळन्तिणीस दुध अधिक येण्यासाठी आंब्याचा वापर करावा.
- मुत्रासंबंधी तक्रारी , उष्णता, जळजळ इ कमी होण्यासाठी आंब्याचा रस व सैंधव घ्यावे.
- आंबा हा उत्तम पोषण करतो. शरीरातील मांस धातुचे पोषण व वाढ करण्यासाठी आंबा फार छान काम करतो.
- हृदयाच्या स्नायूंची दुर्बलता दूर करण्यासाठी म्हणून आंबा उत्तम उपयोगी पडतो.
- ब्लड प्रेशर व मलावष्ठंभ या तक्रारींवर आंब्याचे सेवन केल्याने फायदा होतो.
फळांचे वरीलप्रमाणे अनेक सुपरिणाम किंवा दुष्परिणाम आपल्याला पहायला मिळतात, त्यावरील अधिक माहितीसाठी आयुर्वेदीय वैद्य / डॉक्टर सदैव तुमच्या मदतीसाठी तयार असतात. त्यांच्याशी संपर्क साधावा.
फळांविषयी आणखी माहिती आपण पुढील लेखात जाणून घेवू.
-क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchakarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –