काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान भाग 4
भाजी ( Vegetables )
साधारणतः ‘ भाजी ’ हा विचार जर केला तर त्याचे वेगवेगळे प्रकार केले जाऊ शकतात. पालेभाज्या, फळभाज्या, फुलभाज्या, कंदमूळभाज्या, कडधान्यभाज्या इत्यादि.
पालेभाज्या म्हणजे पानांपासून तयार केलेल्या भाज्या. Leafy vegetables ( पालक, मेथी, शेपू इ.)
फळभाज्या म्हणजे वेली, क्षुप यांना येणारी फळे यांच्यापासून तयार केलेल्या भाज्या ( भेंडी, पडवळ, दोडके, कारले इ. )
फुलभाज्या म्हणजे वेली, क्षुप यांना येणारी फुले यांच्यापासून तयार केलेल्या भाज्या ( हादगा इ. )
कंदमूळभाज्या म्हणजे कंद यांच्यापासून तयार केलेल्या भाज्या ( बीट, बटाटा, गाजर इ. )
कडधान्यभाज्या म्हणजे कडधान्य यांच्यापासून तयार केलेल्या भाज्या ( मुग, चवळी उसळ इ. )
वरील प्रकारांमध्ये जर फरक केला आणि पाहिले तर फळभाजी पालेभाज्यांपेक्षा चांगली. कारण लेखाच्या सुरुवातीला पाहिलेल्या स्पष्टीकरणाप्रमाणे फळभाज्या पालेभाज्यांपेक्षा जास्त टिकतात. पालेभाज्यांचे आयुष्य कमी असते. व त्या जमिनीलगत येत असल्याने जंतूसंसर्ग जमिनीतून ( योग्य न धुतल्यास ) जास्त प्रमाणात होऊ शकतो.
पाने, फुले, फळे, देठ, कंद, छ्त्रशाक ( मशरूम ) असे क्रमाने पुढेपुढे ( उत्तरोत्तर ) पचायला जड होत जातात. म्हणून भूकेनुसार, पचनशक्तीनुसार वरील प्रकारानुसार भाज्यांचे प्रकार खावेत.
कच्च्या भाज्या खाणे हे पचायला आणखीनच जड पडते ( आजकाल सलाड या नावाखाली असे प्रकार चालतात. प्रचंड चीड किंवा कीव येते जेव्हा असे चुकीचे प्रकार समाजात रूढ होतात व ते चांगल्या शिकलेल्या लोकांकडून रूढ होतात. सलाड हा कन्सेप्ट येऊन किती दिवस झाले हो, आणि वेळीच आयुर्वेदासारख्या जुन्या शास्त्रात, अनुभवा अंती लिहिलेल्या गोष्टी यांचा विचार केला नाही तर सर्व समाजापुढे याचे ( अशा चुकीच्या गोष्टींचे ) दुष्परिणाम दिसायला लागल्यावर ( वेळ निघून गेल्यावर ) बघत / विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाही. वजन जास्त असणाऱ्या, जाड्या माणसांची पचनशक्ती आधीच मंद, त्यात वरून हे असे सलाड खायला घालतात. होतही असेल वजन कमी ( कारण पचतच नाही तर अंगी कुठून लागणार ) पण ते किती दिवस, पुन्हा जैसे थे. ( विचार करून बघा. ) ( याबद्दल आणखी विचार पुढे करूयात किंवा तज्ञ वैद्यास विचारावे )
साधारणतः पालेभाज्या हा रोज खाण्याचा प्रकार नाही. नेहमीच्या वापराने पोटदुखी, जंतांची पैदास-वाढ, जास्त प्रमाणात मल जाणे ( संडासला अधिक होणे, आजकाल बऱ्याच लोकांना संडासच्या विविध तक्रारी असतात, फायबर नावाच्या एका फायद्यासाठी बरेच नुकसान सहन कराव लागते. ), पोटात गैसेस धरणे इ. तक्रारी दिसतात. पाश्चिमात्यांचा आहार मुळात नॉन-व्हेज, मांस, मासे, इ. फायबर नसणारे पदार्थ जास्त असा असतो त्यामुळे त्यांना कधीतरी असे भाज्या / सलाड प्रकार खावे लागतात. ते देखील भाज्या नेहमी खात नाहीत. भारतीयांना ती पद्धत मानवणारी नाही. ( इथल्या वातावरणानुसार, देशानुसार )
काही नियम –
- अतिशय कोवळ्या भाज्या ( मुळा सोडून ), रोगीट भाज्या, जुनाट भाज्या, अयोग्य जमीन व अयोग्य पाणी यावर वाढलेल्या भाज्या ( आजकाल गटारीच्या पाण्यावर होणाऱ्या ), सुकवलेल्या भाज्या इ. खाऊ नयेत.
- भाज्या शिजवण्यापूर्वी नळाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात. ( नळाच्या म्हणण्याचा उद्देश धुतलेले पाणी वाहून जाते, भांड्यात धुतल्याने पुन्हा भाजीला जंतू, घाण लागण्याची शक्यता असते.)
- एकदम भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेऊन वापरत रहाणे हे चुकीचे आहे.
- भाज्या शिजवताना तेल, तूप, मोहरी, हळद, हिंग, लसूण इ. गोष्टी आवर्जून वापराव्यात. यांच्यामुळे पोटात वायू होणे, अतिशौचास होणे इ. अनेक तक्रारी कमी रहातात.
- पालेभाज्या करतांना शक्यतो शिजल्यानंतर रस काढून टाकून द्यावा व चोथ्याची भाजी करावी. ( चोथा = फायबर )
- रस – सूप असे पदार्थ करावयाचे झाल्यास वरील हिंग इ. वस्तूंचा वापर अवश्य करावा.
भाज्यांबद्द्ल आणखी माहिती आपण पुढील लेखात जाणून घेवूयात.
– क्रमशः
For more ………
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchakarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –