काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान १
“ गरज ही शोधाची जननी” आणि “शोधले कि सापडते” अशा म्हणी आपल्याकडे प्रचारात आहेत. आता गरज कोणती? तर भूकेची. एकदम बेसिक किवा मुलभूत विचार जर केला तर भूक लागली तर आपण खातो, भूक न लागताच खाणे हा भाग वेगळा पण आता भूक लागली तर मला खाल्ले पाहिजे आणि मग शोध सुरु होतो कि काय खावे ? उपलब्धता तर भरपूर व वैविध्यपूर्ण आहे. तसे पाहिले तर आपण काहीही खाऊ शकतो, अवघड काय आहे त्यात. उचलली माती, टाकली तोंडात, उचलले गवत टाकले तोंडात असे जर कुठलीही वस्तू घेऊन तोंडात टाकली तर चालेल का ? तर नाही. मानवी शरीराचे काही निसर्ग नियम आहेत व त्यानुसारच माणसाला जगावे लागते. मग आता या मानवी शरीराच्या नियमांची माहिती कशी होणार ? तर वयोवृद्धांनी, अनुभवी लोकांनी, शास्त्रज्ञांनी शोधलेली, वर्षानुवर्षे वापरलेली तत्वे जर माहिती झाली तर या शोधाला सोपेपणा यायला मदत होते.
वरीलप्रमाणे काहीही खाल्ले तर चालत नाही, ते पचत नाही, ते आत्मसात होत नाही, अंगी लागत नाही असे आपण म्हणतो आणि असे असेल तर काय, किती व का खावे ? असा प्रश्न नक्कीच पडतो. या प्रश्नाचे सरळ आणि अतिशय सुंदर पद्धतीत उत्तर आयुर्वेदात सापडते. पूर्वीच्या काळी बऱ्यापैकी गोष्टी परंपरेतून माहिती असायच्या, आज कोणी कोणाचे ऐकत नाही त्यामुळे हा लेखनप्रपंच करावा लागतो, असो. – क्रमशः
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchakarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –