दही सेवन नियम
न नक्तं दधि भुंजीत
न चाप्यघृतशर्करम् |
नामुद्गयूषं नाक्षौद्रं नोष्णं नामलकैर्विना | चरक.
- रात्री दही खाऊ नये
- दही गरम करून खाऊ नये.
- तुपसाखरेशिवाय दही खाऊ नये. किंवा मुगाच्या कढणाशिवाय दही खाऊ नये. किंवा मधाशिवाय दही खाऊ नये. किंवा आवळ्याशिवाय दही खाऊ नये.
जर नियमानुसार दहीसेवन केले नाही तर
ज्वरासृकपित्तवीसर्पकुष्ठपाण्ड्वामयभ्रमान |
प्राप्नुयात् कामलां चोग्रां विधिं हित्वा दधिप्रियः | चरक.
ज्वर ( ताप), रक्तपित्त ( शरीरातील विविध openings मधुन रक्त बाहेर पडणे), विसर्प कुष्ठ ( त्वचाविकार, सोरियासिस), पांडु ( anemia), भ्रम ( चक्कर), उग्र कावीळ आदी आजार निर्माण होतात.
वर सांगितले तसे दहीसेवन केले तर त्रास होत नाही पण त्याशिवाय दहीसेवन केले तर वरील क्रमाने आजार होतात. पुर्वी वा आता दहीसेवन केलेले असल्यास वरीलपैकी कुठलाही त्रास नाही ना हे पहावे. त्रास असल्यास योग्य चिकित्सेने अटकाव जरूर करावा.
For more details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchkarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –