आयुर्वेद म्हणजे आयु आणि वेद (व्युत्पत्ती शास्त्रानुसार). आयु म्हणजे आयुष्य व वेद म्हणजे ज्ञान किंवा शास्त्र.
आयुर्वेद शास्त्र म्हणजे सर्वात प्राचीन व्याधी बरी करणारे शास्त्र. हे एक जीवन जगण्याचे शास्त्र आहे. या शास्त्राचा उगम भारतात ५००० वर्षा पुर्वी झाला. कित्येक शतके पारंपारिक मौखिक पध्दतीने वेगवेगळ्या ऋषी/मुनीनी, शिष्यांनी हे शास्त्र लिहून ठेवले. परदेशात आढळणाऱ्या नैसर्गिक उपचारांचे मुळ आयुर्वेदातच आहे. आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे जे विद्वान, योगी आणि गुरू, यांनी सांभाळून ठेवले आहे आणि ५००० वर्षाच्या इतिहासात टिकून आहे. हे शास्त्र वनस्पती वर्ग, प्राणीवर्ग आणि पर्यावरणावर आधारलेले आहे.
आयुर्वेदाचा भर हा रोग होण्यापासुन वाचविणे व योग्य, चांगल्या वनौषधी वापरणे यावर आहे. हे शास्त्र आरोग्य संतुलित ठेवण्यास मदत करते. आयुर्वेदानुसार जीवन म्हणजे मन शरीर व आत्मा यांचे एकत्रीकरण आहे. आयुर्वेद हे फक्त शरीर किंवा शरीर लक्षणांपुरते मर्यादित नसून अध्यात्मिक, मानसिक व सामाजिक पैलु असणारे शास्त्र आहे व ज्यामुळे तंदुरूस्त व आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे.
आयुर्वेद ही एक नैसर्गिक आरोग्य रक्षण करणारी पध्दती आहे. हे शास्त्र शारीरीक, मानसिक आणि भावनिक आरोग्य निसर्गाच्या सहाय्याने टिकविण्यास मदत करते. हे एक परिपुर्ण शास्त्र आहे की, जे फक्त आजारी लोकांना मार्गदर्शन करते असे नव्हे तर सुदृढ लोकांना सुध्दा उपयुक्त आहे. यामध्ये विविध औषधोपचार, स्त्रीरोग, बालरोग, शस्त्रक्रिया, शरीरशास्त्र, नाक कान घसा, दंतशास्त्र, वनौषधी, आयुर्वेदिक आहार व पोषक पदार्थ इ.मार्गदर्शन आहे. आधुनिक वैद्यक शास्त्र हे जसे आजारांच्या लक्षणावरच भर देते तसे आयुर्वेद हे त्या आजाराच्या मुळाशी नैसर्गिक उपचारांच्या मदतीने जाते व आजाराचे मुळ नष्ट करून रूग्णाची प्रतिकार शक्ती वाढविते.
आयुर्वेदात प्रत्येकाच्या प्रकृती नुसार उपचार केले जातात. यामध्ये नैसर्गिक पदार्थ वापरले जातात. या कारणांमुळे यात कोणताही धोका नाही व साइड इफेक्टस् नाहीत. बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की आयुर्वेद हे अतीप्राचीन व अतिप्रगत नैसर्गिक शास्त्र आहे.
For more details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchkarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –