8) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 8

*शमी – Prosopis specigera*

बहुगुणी अशा शमी वृक्षाबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते किंवा हे झाड फारसे बघितलेले नसते.
शमीचे झाड छोट्या-मध्यम आकाराचे आणि काटेरी असते. पाने दिसायला बाभूळ किंवा खैराच्या पानासारखे असतात. मारवाड़ आणि पंजाबमध्ये याच्या *कच्च्या फळांची भाजी* करून खातात.

– शमी कफपित्तशामक आहे.

– खोकला, श्वास यामध्ये कफ कमी करण्यासाठी शमीचा उपयोग होतो

– मेध्य असल्याने मेंदूच्या थकव्यामध्ये याचा वापर करावा

– चक्कर येणे, भ्रम इ मध्येही उपयोग होतो

– त्वचाविकारांमध्येही शमीचे खूप महत्व आहे

– शमी मध्ये स्तंभन गुण असल्याने अतिसार, प्रवाहिका यासारख्या आजारात वापर करतात.

– शमीच्या सेवनाने पोटातील जंत कमी होतात

– मूळव्याध मध्ये याच्या फळाची भाजी खावी

– तसेच रक्तपित्तामध्येही याच्या फळाचा आणि सालीचा उपयोग होतो.

– शमीची साल विषघ्न आहे त्यामुळे विंचवाच्या दंशावर वेदना कमी करण्यासाठी याचा लेप केला जातो.

– शमीफळामुळे केस जातात त्यामुळे अंगावरील लव नाहीशी करण्यासाठी बाह्य उपयोग केला जातो.

– *अशा अत्यंत उपयोगी असलेल्या औषधी वनस्पती आपण आपल्या परिसरात नक्की लावल्या पाहिजेत*

आजकाल भाजी कोणती करावी हा मोठा प्रश्न असतो म्हणून भाजीसाठी तरी शमीचा शोध नक्की घेतला पाहिजे

गणपतीस ही पत्री वाहण्याचा
मंत्र – वक्रतुण्डाय नमः । शमीपत्रं समर्पयामि।।

*गणपती बाप्पा मोरया*
– क्रमशः
– *डॉ आनंद कुलकर्णी*
*अमृता आयुर्वेद, ठाणे*
8779584840
Website – *www.amrutaayurved.in*

Facebook page – https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter/
आयुर्वेद माहितीपर लेखांसाठी ग्रुप ची लिंक खालील प्रमाणे
Link for Joining the group for Ayurved Tips
https://chat.whatsapp.com/BnqJF44r3TPHgj5LjNoCSf