4) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 4
*दूर्वा – (Cynodon dactylon)*
गणपतीला अत्यंत आवडणारी अशी ही दूर्वा म्हणजेच हरळी /हरळ होय. त्याच्या अख्यायिकेमध्ये गणपतीने अनलासुराला गिळून टाकल्यानंतर त्याच्या शरीराचा दाह शमविण्यासाठी कश्यप मुनिंनी गणपतीच्या डोक्यावर दुर्वांची जुडी ठेवून तसेच सेवनासाठी दूर्वा दिल्या होत्या, त्यामुळे गणपतीच्या शरीराची आग कमी झाली.
– त्यामुळे आपल्याला दाह (burning sensation) /आगआग शान्त करण्यासाठी ,पित्तज विसर्प यासारख्या आजारात दुर्वांचा किंवा दुर्वांच्या रसाचा लेप केला जातो.
– तृष्णा , वारंवार तहान लागणे यामध्ये दुर्वा घातलेले पाणी प्यावे
– डोळ्यांची आग होणे, डोळे येणे यामध्ये 2 थेंब दुर्वांचा रस डोळ्यात टाकल्यास उपयोग होतो
– शीतपित्त (urticaria)या रोगात अंगाचा दाह होत असल्यास दुर्वांचा रस किंवा लेप अंगाला लावण्यासाठी वापरतात
– पित्तामुळे होणाऱ्या डोकेदुखीत दुर्वांचा लेप कपाळ इ ठिकाणी केल्याने दुखावा कमी होतो
– त्वचाविकारात त्वचेची आग होत असल्यास दुर्वा उपयोगी पडतात
– जखम / व्रण लवकर भरून येण्यासाठी दुर्वा खूप मदत करतात
– वारंवार उलटी होणे, पित्त पडणे, जळजळ होणे यामध्येही दुर्वा सेवन केल्याने लाभ होतो
– रक्तपित्त, रक्तस्राव (bleeding disorders) होत असल्यास 2 चमचे दुर्वांचा रस खडीसाखर आणि तुपाबरोबर प्यायला द्यावा.
– उन्हाळ्यात नाकाचा घोणा फुटून रक्त येते किंवा सर्दी असताना जोरात नाक शिंकरल्यास रक्त येते अश्या वेळी नाकात 2 थेंब दुर्वांचा रस घालावा.
– मूत्राची / लघवीची जळजळ, लघवी अडणे या त्रासात दूर्वा उपयोगी आहेत.
– वारंवार गर्भाशय भ्रंश किंवा वारंवार गर्भपात या अवस्थांमध्ये दुर्वा गर्भाशयाला बळ देतात, गर्भाशयाचे पोषण करतात
– पायाच्या पावलांचा दाह होत असेल तर सकाळी दुर्वांच्या गवतावर अनवाणी चालणे किंवा दुर्वांचा रस पायाला लावणे अत्यंत लाभदायक आहे.
– अनेक प्रकारच्या विष चिकित्सेमध्येही दुर्वांचा वापर होतो
– आयुर्वेदातील औषधांमध्ये दुर्वा भावना द्रव्य म्हणूनही वापरली जाते
– अशी ही बहुगुणी दुर्वा कुठेही, कधीही लावल्यास उगवण्यासारखी आहे म्हणून खरंतर ही संजीवनी (जिवंत होणारी) वनस्पतीच म्हणायला हवी
– *अशा अत्यंत उपयोगी असलेल्या औषधी वनस्पती आपण आपल्या परिसरात नक्की लावल्या पाहिजेत*
गणपतीस ही पत्री वाहण्याचा
मंत्र – गजाननाय नमः। दुर्वां समर्पयामि।।
*गणपती बाप्पा मोरया*
– क्रमशः
– *डॉ आनंद कुलकर्णी*
*अमृता आयुर्वेद, ठाणे*
8779584840
Website – *www.amrutaayurved.in*
Facebook page – https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter/
आयुर्वेद माहितीपर लेखांसाठी ग्रुप ची लिंक खालील प्रमाणे
Link for Joining the group for Ayurved Tips
https://chat.whatsapp.com/BnqJF44r3TPHgj5LjNoCSf