3) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 3
*बिल्व – (Aegle marmelos)*
बिल्व म्हणजे बेल. महादेवाच्या पूजेतील महत्वाचे पान, त्यामुळे मंदिरांच्या आसपास ही झाडे लावलेली असतात.
– बेलाच्या पानांचा सूजेवर स्वेदन (शेक) देण्यासाठी वापर करतात
– बेलाची पाने रुक्ष असल्याने क्लेद, कफाचे शोषण करतात, त्यामुळे *कफ, श्वास, सर्दी खोकला* यामध्ये याच्या पानांचा काढा अत्यंत उपयोगी पडतो.
– मधुमेहासाठीही बेलाच्या पानांचा रस घेतल्यास मुत्र शर्करा (साखर) कमी होण्यास मदत होते
– अतिसार (loose motion) असल्यास बेलाची पाने, बडीशेप आणि आंब्याची साल यांचा काढा करून घ्यावा
– लहान तसेच मोठ्यांमधील पोटातील कृमींवर (जंतावर) बेलाच्या पानांचा रस द्यावा
– तोंड आले (mouth ulcer) असल्यास बेलाच्या पानांचा काढा गुळण्या करण्यासाठी वापरावा
– मेदोरोग, घाम जास्ती येणे यावरही बेलाचा सुंदर उपयोग होतो
– बेलाचे फळ दीपन,पाचन,ग्राही, कृमिघ्न असून त्यामुळे अतिसार, ग्रहणी, रक्ती मूळव्याध यासारख्या आजारात उपयोगी ठरते.
– उलटी (च्छर्दी) मध्ये बेलफळाच्या सालीचा काढा किंवा चूर्ण मध किंवा गुळाबरोबर द्यावा, लवकर आराम पडतो
– बेलफळे ही कानाच्या विकारामध्येही तेलात तयार करून वापरली जातात.
– बेलाचे मूळ वातशामक आहे त्याचा समावेश आयुर्वेदातील दशमूळ या औषधांमध्ये आहे. त्यामुळे वात विकारांमध्ये, मज्जातंतुंना बळ देण्यासाठी बेलाचा वापर केला जातो.
– हृदय दुर्बल (थकले) झाले असल्यास त्याला ताकद देण्याचे काम बेल मूळ अत्यंत चांगल्या पद्धतीने करते
– दशमूळाचा एक घटक असल्याने बाळंतिणीला देता येते.
– दौर्बल्यामध्ये (शारीरिक थकव्यामध्ये) पिकलेले बेलफळ उपयोगी आहे.
– *सुकलेली बेलाची पानेही औषधी वापरासाठी चालतात, म्हणून पूजेनंतर पाने टाकून देण्यापेक्षा त्याचा औषधासाठी वापर जरूर करावा*
– बेलफळाचा मुरंबा, सरबत अश्या टिकाऊ स्वरुपातही वापरासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
– *अशा अत्यंत उपयोगी असलेल्या औषधी वनस्पती आपण आपल्या परिसरात नक्की लावल्या पाहिजेत*
गणपतीस ही पत्री वाहण्याचा मंत्र – उमापुत्राय नमः। बिल्वपत्रं समर्पयामि।।
*गणपती बाप्पा मोरया*
– क्रमशः
– *डॉ आनंद कुलकर्णी*
*अमृता आयुर्वेद, ठाणे*
8779584840
Website – *www.amrutaayurved.in*
Facebook page – https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter/
आयुर्वेद माहितीपर लेखांसाठी ग्रुप ची लिंक खालील प्रमाणे
Link for Joining the group for Ayurved Tips
https://chat.whatsapp.com/BnqJF44r3TPHgj5LjNoCSf