2) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 2 माका
2) माका (भृंगराज) (Eclipta alba) –
– माका (भृंगराज) ही आपल्या सगळ्यांना माहीत असलेली अशी वनस्पती आहे, टीव्ही वरती आपण केसांच्या तेलाच्या जाहिराती पाहतो, बहुतांश सर्वच जाहिरातीत केसांच्या तेलांचा घटकद्रव्य असलेला माका आपल्या केश्य गुणधर्माने सगळ्यांना परिचित आहे.
– माका केस गळणे, पिकणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या केशविकारांत वापरला जातो.
पण भृंगराज फक्त केसांच्या तक्रारीसाठीच वापरला जातो असे नाही तर माका अनेक रोगांमध्ये वापरला जातो.
– ज्वरामध्ये / तापामध्ये माक्याचा रस खडीसाखरेबरोबर दिल्यास खूप उपयोग होतो.
– *माका प्रामुख्याने पित्तावर, यकृतावर (Liver लिव्हर वर) काम करतो*. ज्यामुळे पित्ताचा स्राव सुधारतो, दोष पाचन होते आणि पित्ताचे रेचनही होते.
– आयुर्वेदातील अनेक पित्तशामक औषधांमध्ये माका वापरला जातो.
– डोळ्यांच्या विकारात आश्च्योतन पद्धतीने,
– कानाच्या तक्रारींमध्ये कर्णपूरण पद्धतीने
– डोकेदुखीसारख्या दुर्धर रोगात नस्य पद्धतीने (नाकात) अश्या विविध पद्धतीने माक्याचे औषध वापरले जाते.
– शिरशूलात माक्याचा रस डोक्याला चोळावा
– रस केसांना चोळावा
– खोकला, कफ, श्वास या रोगात रस द्यावा
– रक्त वाढण्यासाठी माक्याच्या रसात मिरपूड घालून दह्याबरोबर द्यावा, खूप मदत करतो
– माका हा रक्तशुद्धीकर आहे
– रक्तदाब वाढल्यास त्यामध्येही उपयोगी आहे
– त्वचा विकारांवर, स्त्राव येत असल्यास तसेच शितपित्तावरही याचा खूप उपयोग होतो
– दृष्टीची शक्ती वाढण्यासाठी मदत होते
– किडनी ला ताकद देऊन तिचे कार्य सुधारायला मदत करतो
– जंतांची नेहमी तक्रार असल्यास एरंडतेलासोबत वापरल्यास जंत कमी होतात.
*त्याचा शक्यतो रसच वापरावा*
म्हणून शक्यतो ताजा मिळवण्याचा प्रयत्न करावा
गणपतीस ही पत्री वाहताना म्हणायचा मंत्र – गणाधिपाय नमः । भृंगराजपत्रं समर्पयामि ।।
– क्रमशः
*गणपती बाप्पा मोरया*
– *डॉ आनंद कुलकर्णी*
*अमृता आयुर्वेद, ठाणे*
8779584840
*www.amrutaayurved.in*