11) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 11 करवीर कण्हेर
11) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 11
*करवीर – Nerium indicum*
करवीर म्हणजे कण्हेर.
कण्हेर ही बऱ्याच वेळा सुशोभिकरणासाठी लावली जाते, बागेमध्ये रस्त्यांच्या कडेने ही आपल्याला बघायला मिळते.
– अतिशय सुंदर दिसणारी करवीर ही कफवातशामक, पित्तवर्धन करणारी आहे.
– कण्हेर ही विषमज्वर, हिवताप यामध्ये योग्य प्रमाणात वापरल्यास ताप पुन्हा येत नाही, इतकी प्रभावी आहे
– कण्हेरीच्या मुळांचा लेप करण्याने जखमेमधील दुष्ट व्रण स्त्राव कमी होतात
तसेच याच्या पानांचा कल्क करून जखमेवर बांधता येतो
– मुळव्याधीवर कण्हेरीचे मूळ उगाळून लेप करतात
– करवीर ही दीपन, भेदन गुणाची असल्याने उदररोग (पोटात पाणी साठणे Ascites), विबंध, मलावरोध यासारख्या रोगात देतात.
– हृदयावर याची क्रिया डिजिटलिस या औषधाप्रमाणे होते. हृदयाला बळ मिळते परंतु अधिक मात्रेत वापरू नये
– किडनीमधील रक्तप्रवाह सुधारल्याने मूत्रप्रवृत्ती वाढविण्यासाठी याचा फायदा होतो म्हणून लघवी कमी होत असल्यास , किडनी स्टोन असल्यास कण्हेर वापरतात.
– त्वचारोगात , फ़िरंग-उपदंश व्याधींच्या व्रणांत कन्हेरमूळसिद्धतैल वापरतात.
– दम्याच्या विकारांत कन्हेरीच्या पानांचे भस्म आैषध म्हणून वापरतात.
– सर्पविषबाधेत कण्हेरमूळ चूर्ण थोड्या थोड्या प्रमाणात दिल्यास जोरदार उलटी होऊन विषाचा प्रभाव कमी होतो.
*कण्हेरीचा औषधी उपयोग करताना वैद्यकीय सल्ल्यानेच करावा. कारण अधिक प्रमाणात (drug overdose) वापरल्यास* हृदयक्रिया बिघडणे किंवा लघवीवाटे रक्तस्राव होणे, श्वास बंद होणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे वैद्यकीय मार्गदर्शनाशिवाय वापरु नये.
– कण्हेरीच्या मुळांची शुद्धी करावी लागते आणि ती दुधामध्ये दोलायंत्र या विशिष्ट पद्धतीने करता येते
– *अशा अत्यंत उपयोगी असलेल्या औषधी वनस्पती आपण आपल्या परिसरात नक्की लावल्या पाहिजेत*
गणपतीस ही पत्री वाहण्याचा
मंत्र – विकटाय नमः। करवीरपत्रं समर्पयामि ।।
*गणपती बाप्पा मोरया*
– क्रमशः
– *डॉ आनंद कुलकर्णी*
*अमृता आयुर्वेद, ठाणे*
8779584840
Website – *www.amrutaayurved.in*
Facebook page – https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter/
आयुर्वेद माहितीपर लेखांसाठी ग्रुप ची लिंक खालील प्रमाणे
Link for Joining the group for Ayurved Tips
https://chat.whatsapp.com/BnqJF44r3TPHgj5LjNoCSf