10) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 10
*बृहती – Solanum indicum*
बृहती म्हणजे डोरली.
– बृहती कफ कमी करणारी व वात अनुलोमन करणारी असल्याने खोकला, श्वास (दम लागणे) यामध्ये मधाबरोबर देतात, त्यामुळे कफाच्या असलेल्या अशा श्वसनसंस्थेवर हिचे उत्तम कार्य होते.
– सर्दी , घसा बसणे अश्या विकारांतही बृहतीचा रस किंवा चूर्ण मधासोबत देतात.
– नाकातील स्रावाला घाण वास येणे अश्या तक्रारीमध्ये नाकात थेंब टाकणे , त्याची धुरी देणे इ उपाय केले जातात.
– उलटी च्या तक्रारींमध्ये याचे फळाचा रस मध आणि तुपाबरोबर दिल्यास आराम वाटतो
– तापाच्या सुरुवातीच्या काळात बृहती आणि सुंठ याचा काढा देता येतो
– गोड दह्याबरोबर बृहतीचा कल्क वापरल्यास मुतखडयामध्ये उपयोग होतो
– मुखाची दुर्गंधी येत असल्यास डोरलीच्या काढ्याने गुळण्या कराव्या
– चाई मध्ये बृहती चा रस मधातून लावल्यास केस येण्यास मदत होते
– दुखऱ्या भागावर लेप केल्याने वेदना कमी होण्यासाठी उपयोग होतो
– *अशा अत्यंत उपयोगी असलेल्या औषधी वनस्पती आपण आपल्या परिसरात नक्की लावल्या पाहिजेत*
मंत्र – एकदंताय नमः। बृहतीपत्रं समर्पयामि ।।
*गणपती बाप्पा मोरया*
– क्रमशः
– *डॉ आनंद कुलकर्णी*
*अमृता आयुर्वेद, ठाणे*
8779584840
Website – *www.amrutaayurved.in*
Facebook page – https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter/
आयुर्वेद माहितीपर लेखांसाठी ग्रुप ची लिंक खालील प्रमाणे
Link for Joining the group for Ayurved Tips
https://chat.whatsapp.com/BnqJF44r3TPHgj5LjNoCSf