हनुमान, वायू, वात आणि आयुर्वेद

पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांना पंचमहाभूते असे म्हणतात. वायू / वात हा प्रचंड सामर्थ्य असलेला आहे. मात्र  तो आपल्या शरीरासाठी उपकारक व्हावा याकरता त्याला आटोक्यात ठेवणे हे आवश्यक असते.

हनुमंताला ‘पवनपुत्र’/ वायूपुत्र म्हटले गेले आहे. याचा अर्थ वायू महाभूताचा प्रभाव हनुमंतावर अधिक प्रमाणात आहे. इतका की जन्म झाल्यावर तेज महाभूताचे मूर्तिमंत रूप असलेल्या सूर्यालाच गिळंकृत करण्यास हनुमान झेपावले.

शरीरातील वात नियंत्रित ठेवण्याचा साधा-सोपा मार्ग म्हणजे दररोज अंघोळीपूर्वी कोमट तेलाचा अभ्यंग करणे. त्वचा हा अवयव सर्व शरीरव्यापी आहे. तेल हे वातावरील सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे नियमित अभ्यंग केल्यास वात आटोक्यात तर राहतोच; मात्र त्वचेचे रोगदेखील होत नाहीत. शिवाय शरीराला बळकटी येवून ते वज्राप्रमाणे कठीण होते. हनुमानाला शनिवारी तेल वाहण्याचा प्रघात आपल्याला अभ्यंगाचे महत्वच शिकवतो

हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून सुंठवडा वापरला जातो. साधारणपणे सूंठ, पिठीसाखर आणि तीळ यांच्यापासून मिश्रणापासून हा सुंठवडा तयार केला जातो. सुंठीमुळे रुची वाढते, पचन सुधारते, सुंठ पचायला हलकी, वीर्याने उष्ण व विपाकाने मधुर असते, गुणाने स्निग्ध असते, तसेच आमवातात हितकर असते. सुंठ ही केवळ वात कमी करण्यास उपयुक्त आहे असे नसून ती ‘वृष्य’ आहे असे आयुर्वेद सांगतो. थोडक्यात सुंठ ही पौरुषशक्ती वाढवणारी आहे. हनुमान म्हणजे साक्षात पौरुषशक्तीच.

आयुर्वेदाने उत्तम आचार हे यशाचे साधन मानले आहे. बलवान आणि बुद्धिमान असूनदेखील प्रभू रामचंद्रांच्या चरणी विनम्र भाव ठेवणारे हनुमान आपल्याला उत्तम आचार कसे असावे याचीच शिकवण देतात.

आपले शास्त्र-परंपरा यातून काहीतरी आरोग्यसंदेश दडलेला आहे हे निश्चित. गरज आहे ती; त्याला डोळसपणे- श्रद्धेने नीट अभ्यासण्याची.

For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in

All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594

For more informative Ayurveda articles –

www.amrutaayurved.in      http://amrutaayurvedthane.blogspot.in