सातू पीठ – उत्कृष्ट बलवर्धक आयुर्वेदिक तर्पण ( Sattu – Ayurvedic Tonic )
सातू पीठ – (सत्तू)
वर्षभर विशेषतः उन्हाळ्यात सर्वांना हितकर व पोषक , त्वरित तरतरीत करणारे खाद्य म्हणजे पारंपरिक सातूचे पीठ
साहित्य
- जव (Barley)(जवस नव्हे) तूस काढलेले वा तसेच पण चालतात – 1 किलो
- गोड डाळ्या (चिवड्यात टाकतात त्या) किंवा दाळ – 250 ग्राम
- जीरे – २५ ग्राम
- वेलची पूड – ५ ग्राम
- सुंठ – २५ ग्राम
- ह्या पदार्थावर पाणी पिऊ नये
- भोजनानंतर हे खाऊ नये.
- रात्री खाऊ नये तसेच अति पावसाळ्यात हा पदार्थ खाऊ नये.
- तत्काळ ऊर्जा देते.
- कुपोषण लवकर दूर होते.
- वाढत्या वयाच्या सर्व अन्न घेणाऱ्या लहान मुलांपासून वृद्ध वयस्क माणसांना हे उत्तम पोषण देते.
- उन्हाळ्यात होणारी आगआग, लाहीलाही कमी होते, सारखे पाणी पाणी होत नाही. तसेंच येता जाता खाय खाय कमी होते. तृप्ती येते.
- प्रवासातही सहज करता येईल असा रेडि टू इट असा मेन्यू आहे. उन्हाळी दीर्घ प्रवासात उत्तम आहे.
- मधुमेही , डायबेटीस रुग्ण विना गूळ-साखर फक्त पाणी मिक्स करून हा पदार्थ नक्कीच घेऊ शकतात.
- मलावरोध तक्रार असेल तर त्यालाही आराम मिळतो. (मात्र त्यासाठी जव घ्यावे गहू घेऊ नयेत).