कायकिती व का घ्यावे आयुर्वेदानुसार शंका समाधान

फलवर्ग

फळे ( Fruits ) भाग 20

फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.

संत्री / नारंगी (Orange)

लिंबासारखेच सजातीय असे हे फळ असून जगामध्ये सर्वत्र याचा उपयोग केला जातो. या झाडाच्या सानिध्यात राहिल्याने भूतबाधा होत नाही असे एक मत प्रचलित होते. संत्र्याची साल कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवल्यास कपड्यांना कीड इ लागत नाही.

या फळाचा रस साधारणतः सर्व वयातील व्यक्तींना चालतो हे या फळाविषयी विशेष सांगावे वाटते.

संत्र्याच्या फळाचा रस

या फळाचा रस हा सद्यःतर्पण म्हणजे लगेच तृप्ती, ताजगी, किंवा फ्रेशनेस देणारा आहे. शरीरातील रस धातूचे याने त्वरित पोषण होते. चवीनुसार मीठ / सैंधव घातल्यास उत्तम चव लागते. श्रम करणारे, व्यायाम करणारे, खेळाडू इ यांना हे फळ म्हणजे अमृतच होय. या फळाच्या वापराने जास्त घाम येवूनही शरीरातील जलांश लौकर कमी होत नाही, थकवा जाणवत नाही.

हृदय, रसवाहीन्या, रक्तवाहिन्या इ वर दुष्परिणाम करणारा अतिरिक्त ताण संत्र्याच्या रसाने कमी होतो. हृदयाच्या स्नायूंना त्वरित बळ देणारा असा हा संत्र्याचा रस होय.

जर कोठूनही रक्तस्राव होत असल्यास औषधांबरोबरच संत्र्याचा रस साखरेबरोबर घेतल्यास उत्तम लाभ दिसून येतो. ( वैद्याचा सल्ला आवश्यक )

गर्भिणीला होणाऱ्या सकाळच्या उलट्या यामध्ये संत्र्याची फोड चोखून खावी व चोथा फेकून द्यावा यामुळे मळमळ कमी होऊन त्वरित बरे वाटते.

लघवी भरपूर साफ होण्यासाठी तसेच शरीरातील विषारी घटक निघून जाण्यासाठी संत्र्याचा रस घ्यावा.

अतिमद्य सेवनामुळे होणारा सर्वांगाचा दाह संत्र्याच्या रसाने कमी होतो. यामध्ये भुकेच्या वेळी संत्री खावीत.

कालावधीचा ताप ( काही दिवसांनी पुन्हा पुन्हा उलटणारा ), गोवर इ मध्ये संत्र्याचा रस द्यावा म्हणजे शरीरातील उष्णता मूत्रावाटे बाहेर पडते.

संत्र्याचा रस , मीठ व मध असे मिश्रण घेतल्याने पोटातील वात कमी होण्यास मदत होते. तसेच या मिश्रणाने कफ सुटण्यास मदत होते. ( परंतु येथे संत्रे कच्चे किंवा आंबट असू नये नाहीतर त्यामुळेच कफ वाढलेला दिसून येईल )

पोटाच्या आणि पचनाच्या तक्रारी असणाऱ्या बालकांमध्ये संत्र्याचा रस दिल्याने फायदा दिसून येतो.

पोटात भूक जाणवते परंतु अन्नाची चव लागत नाही अशा वेळी संत्र्याचा रस – ओवा, मिरे, हिंग, सैंधव यांसह घ्यावा.

संत्र्याची साल-

      एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध या संत्र्याच्या सालीला येतो. याचे तेलही काढले जाते. विविध अत्तरांमध्ये याचा वापर केला जातो.

याची साल वाळवून आपण सुरक्षित ठेऊ शकतो. श्रीखंड किंवा अन्य खाद्य पदार्थ यांच्यामध्ये याचा वापर करता येतो.

संत्र्याच्या सालीची चटणी सुद्धा खुप सुंदर लागते. या चटणीचा आंतर्बाह्य उपयोग करता येतो.

सालीचा काढा करून घेतल्यास उराशी होणारी जळजळ, पित्त, अपचन अशा तक्रारी यांमध्ये फायदा दिसून येतो.

( तज्ञ वैद्याचे मार्गदर्शन आवश्यक).

संत्र्याचे सरबत

समभाग साखर घालून ठेवून द्यावे. गरजेप्रमाणे, चवीप्रमाणे व सैंधव – पाणी घालून घ्यावे. थकवा कमी होण्यास मदत होते.

सर्व वयोगटातील व विशेषतः आजारी माणसांना हे अतिशय उपयुक्त असे आहे.

सावधानता

संत्र्याचा वापर फळ कच्चे असताना करू नये.

तसेच आंबट असल्यास न खाल्लेले बरे.

वारंवार सर्दी, खोकला होणाऱ्या लोकांनी वैद्याच्या सल्ल्यानेच वापर करावा.

क्रमशः

                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),

                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)

अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594

For more ………
Old articles about vegetables and fruits available

please see the articles on www.amrutaayurved.in

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center

Contact – 9869105594

For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in

All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594

For more informative Ayurveda articles –

www.amrutaayurved.in

http://amrutaayurvedthane.blogspot.in

https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter