शरद ऋतूत (ऑक्टोबर, नोव्हेंबर) काय काय कराल ? (शरद ऋतूचर्या)
शरद ऋतूत (ऑक्टोबर, नोव्हेंबर)
काय काय कराल ? (शरद ऋतूचर्या)
*पथ्यकर (हितकर) गोष्टी*
– या काळात पित्त वाढलेले असल्याने आहारात पित्तशामक अशा मधुर(गोड), तिक्त(कडू) व कषाय(तुरट) रसाच्या द्रव्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. *भात, ज्वारी* या कषाय द्रव्यांचा पण पचायला हलक्या धान्यांचा आहारात प्रामुख्याने उपयोग करावा.
– *मूग, मसूर* यांसारखी तुरट रसाची व मधुर अनुरस असणारी द्विदल धान्ये घ्यावीत.
– *दूध व तूप* अवश्य घ्यावे. रात्री चांदण्यात ठेवलेले (फ्रिजमधील नाही) शीतल दूध तूप प्यावे
– *नारळ* हा मधुर रसाचा, शीतल, पित्तप्रशमन करणारा असल्याने त्याचाही उपयोग भरपूर करावा.
– कडवट पदार्थांपैकी कारल्याची भाजी, *पडवळची भाजी* अधिक खाव्यात.
– आंबट गोष्टी खाऊ नयेत. पण *आमसुल व आवळा* मात्र पित्तशामक असल्याने त्यांचा वापर जरूर करावा.
– *#मोरावळा, #गुलकंद* जरूर खावा.
– *डाळींब*, चिक्कू, सीताफळ, केळी ही फळेही हितकर आहेत.
– आले, ओली हळद व लिंबू लोणचे खावे पण कैरीचे लोणचे मात्र खाऊ नये.
– लसूण कमी वापरावा.
– तसेच योगासने, *#शितली #प्राणायाम*, ध्यान हितकारक ठरतात.
*अपथ्यकर (अहितकर)* म्हणजे कोणत्या गोष्टी टाळाव्यात
– उष्ण, तीक्ष्ण, मसालेदार, कोरडे, आंबवलेले, शिळे पदार्थ पूर्ण टाळावे.
– पोटात तडस लागेपर्यंत जेवू नये.
– दिवसा झोपू नये.
– रात्री जागरण करू नये.
*आयुर्वेदातील उपक्रम*
स्वस्थ मनुष्याने तसेच ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी शरद ऋतूत *#विरेचन आणि #रक्तमोक्षण* हे शरीरशुद्धीचे उपक्रम योग्य त्या आयुर्वेदीय डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यावेत. विरेचन हा पित्तदोषावरील श्रेष्ठ असा शोधनोपक्रम आहे
तसेच *#अभ्यंग*(अंगाला खोबरेल तेल लावणे) करावा
थंड काढ्यांचे, दूध, साखर पाण्याचे *#अवगाह* करणे
*#नस्य* म्हणजे नाकाला आतून तूप लावणे
इ आयुर्वेदीय पंचकर्मातील उपचार अत्यंत फायदेशीर ठरतात
याप्रमाणे जर आहार-विहार आणि उपक्रम केल्यास आरोग्य टिकून राहते व या ऋतुनुसार होणार्या पित्तज विकारांचा त्रास होत नाही
– *डॉ आनंद कुलकर्णी*,
*अमृता आयुर्वेद, ठाणे*
8779584840
Website – www.amrutaayurved.in