#रोग_अनुत्पादनीय
(#रोग_होऊच_नये_म्हणून
काय काय करावे)

 

             वेगान न धारयेत
(नैसर्गिक वेग अडवू नये)

14 नैसर्गिक वेग – #मल, #मूत्र, #अपान_वायु, #ढेकर, #शिंक, #भूक, #तहान, #खोकला, #जांभई, #उलटी, #अश्रु(#रडणे), #शुक्र, #झोप, #श्रमजन्य (कष्टामुळे लागलेला) #श्वास

वरील #नैसर्गिक_जाणिवा अडवू नयेत. ते मल त्या वेगांचे वेळीच निराकरण करावे,
नाहीतर कालांतराने भयंकर रोग तयार होतात.

                 आता काय अडवावे?
तर मानसिक वेग अडवावेत

#लोभ, #ईर्ष्या, #द्वेष, #मत्सर, #काम  हे वेग , यांच्या जाणिवा कमी कराव्यात.

जर तरीही मल साठलेच तर त्यांचे निराकरण हे #लंघन, #पाचन यांनी करावे

जर त्यानेही निराकरण झाले नाही तर ते दोष / मल हे शरीराबाहेर काढून टाकावेत त्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर यांच्या योग्य सल्याने #आयुर्वेदीय #पंचकर्म द्वारे #शरीरशुद्धी करून घ्यावी.

नंतर #च्यवनप्राश ई सारख्या रसायन औषधांचा वापर करावा.

नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः |
दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः || – अ.हृ.सु. 5/37

रोग होऊ नये म्हणून
– नित्य हितकारक आहार विहार यांचे सेवन,
– विचार करून कार्यप्रवृत्त होणे,
– विषय लंपट न होणे,
– दानशील,
– समदृष्टि,
– सत्यवक्तेपणा,
– क्षमावान,
– आप्त (विश्वासु व्यक्ति) वैद्य, गुरु यांचा सल्ला, त्यांच्याबरोबर रहाणे

                      – डॉ आनंद कुलकर्णी व डॉ अमृता कुलकर्णी , ठाणे