काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

भाजी ( Vegetables ) – भाग 7

पालेभाज्या –

मागे उरलेल्या पालेभाज्याचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे.

  • चुका – आतड्यांची शक्ती वाढवणारी व त्यांची शोषण क्षमता वाढवणारी अशी ही भाजी होय. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी काळजीपूर्वक या भाजीचा वापर करावा. किंवा तुपासह खावी.
  • माठ – भूक अनियमित झाल्यास ( कधी कमी – कधी जास्त भूक ) काटे माठाची भाजी खावी. पोटात वायू व लघवीच्या तक्रारी असणाऱ्याने वैद्याच्या सल्ल्याने घ्यावी.
  • शेपू – एकाच वेळी जास्त प्रमाणात व जास्त दिवस पर्यंत ही भाजी खाऊ नये. याने पित्ताचा प्रकोप होतो म्हणून पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी ही भाजी टाळावी.
  • शेवगा – वातरोगांसाठी अत्यंत उपयुक्त भाजी होय. मात्र ही भाजी पित्ताचा त्रास वाढवणारी भाजी ठरते. शेंगांचा वापर आहारात करावा. पाने, मुळ, डिंक यांचा वापर वैद्याच्या सल्ल्याने करावा.
  • तांदुळजा – ही एक पथ्यकर अशी भाजी आहे. शरीरातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकण्याचे काम करते. ही भाजी ताजीच तव्यावर परतून घ्यावी म्हणजे चांगले परिणाम दिसतात.
  • अजमोदा – भाजीसाठी पाने, बी, मूळ यांचा वापर करतात. पोटातील वायूची तक्रार असणाऱ्यानी ही भाजी अवश्य खावी हे वेगळेपणाने सांगण्याची गरज नसावी. फक्त उष्ण, तीक्ष्ण असल्याने पिताचा त्रास असलेल्यांनी जपून वापर करावा. उन्हाळ्यात वापरू नये.
  • अंबाडी – आंबट चवीची ही अंबाडीची भाजी व भात यांचे मिश्रण उत्तम चव देऊन जाते. तेलकट खाल्यानंतर होणाऱ्या त्रासावर ही भाजी उपयोगी पडते. यकृत व हृदयाला चांगली होय. अम्लपित्ताच्या रुग्णांनी घेऊ नये. उन्हाळ्यात जास्त वापरू नये. तसेच नित्य खाण्याजोगी ही भाजी नव्हे.
  • करडई – करडई ची भाजी करण्यासाठी कोवळी पानेच वापरावीत. पोटातील जंतासाठी ही भाजी खावी. ही मुळव्याधीला उपयोगी आहे. पित्त असणार्यांनी जपून वापरावी. ही भाजी पचायला जड असते. शक्यतो रात्रीच्या वेळी ही भाजी खाऊ नये.
  • टाकळा – त्वचाविकारामध्ये ही भाजी हितकर होय. जंत झाले असल्यास ही भाजी खावी. मेद वाढलेल्यांनी हिचा वापर अवश्य करावा. त्वचेसाठी ही भाजी कान्तीदायक अशी ठरते. जुनी भाजी खाऊ नये. अतिवापर टाळावा.
  • हादगा – याच्या फुलांची, पानांची, शेंगांची भाजी करतात. पूर्वी प्रत्येकाच्या शेतात हादगा असायचाच. सर्दी – कफ – खोकला यामध्ये ही भाजी चांगली. डोळ्यांनाही हितकर अशी आहे. शेंगा पित्ताचा त्रास असणार्यांनी कमी वापराव्यात.
  • पुनर्नवा – वसूची भाजी असेही नाव या भाजीला आहे. ही पावसाळ्यात भरपूर उगवते. अत्यंत गुणकारी भाजी होय. यकृताची शक्ती वाढवण्यास मदत करते. हिच्या मुळीचा वापर आयुर्वेदीय वैद्याच्या सल्ल्यानेच करावा.
  • अळू – अळूची पाने , कांड व कंद यांची भाजी करतात. भाजीपेक्षा आता अळूवड्या जास्त वापरात दिसतात. काही वर्षापूर्वी लग्नसमारंभात अळूची भाजी असायची. बाळन्तिणीस दुध येण्यास भाजी हितकार होय. हृदय रोग, गसेस असणार्यांनी ही भाजी जपून खावी. अळूच्या कंदाचा नेहमी वापर करू नये.

वरील पालेभाज्यांमध्ये आजकाल काही भाज्या नावालासुद्धा बघायला मिळत नाहीत, पण आरोग्याच्या हितासाठी प्रयत्न केल्यास आपण त्या उपलब्ध करून घेऊ शकतो.

“प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे”

इच्छा असेल तर सर्व काही मिळू शकते. प्रयत्न करून बघावे कि कुणा शेतकऱ्याकडे अश्या भाज्या उपलब्ध होतात का. विदेशी भाज्या खाण्यापेक्षा असे प्रयत्न नक्कीच फायदेशीर ठरतात.

भाज्यांबद्द्ल आणखी माहिती आपण पुढील लेखात जाणून घेवूयात.

– क्रमशः

– वैद्य आनंद कुलकर्णी

M.D. (Med. Ayu),

CYEd, DYA, MA (Sanskrit)

अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594

For more ………

please see the articles on www.amrutaayurved.in

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center

Contact – 9869105594

For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in

All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594

For more informative Ayurveda articles –

www.amrutaayurved.in      http://amrutaayurvedthane.blogspot.in  https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter