भाजी ( Vegetables ) – भाग 6

कंदमूळ भाज्या

( हा पचनास अत्यंत जड असा भाजीचा प्रकार होय. )

  • बटाटा – बटाटा शक्यतो जुना करून वापरावा. नवीन बटाटा चिकट व क्वचित उग्रवासाचा असतो. भाजलेला बटाटा सर्दी, शिंका यांसाठी चांगला तर उकडलेला लघवीच्या तक्रारींवर चांगला असतो. पचायला जड म्हणून पोटदुखी, सूज, सांधेदुखी यात वापर करू नये. याचा वेफर्स हा पदार्थ शक्यतो टाळावा.
  • बीट – बीट नेहमी उकडूनच खावे. कमी धागे असलेले बीट चांगले व पचायला कमी जड असे असते. रक्त वाढवण्यासाठी उत्तम भाजी ( आहारीय पदार्थ ) होय.
  • रताळी – रताळी यांचा टानिक ( स्वास्थ्यवर्धक ) म्हणून वापर करता येतो. पण रताळी उकडून घ्यावी कारण पचायला अत्यंत जड असतात.
  • सुरण – मुळव्याधीच्या रुग्णांनी अवश्य खावी अशी ही भाजी होय. पण चिंचेच्या तुकड्यांबरोबर किवा आमसुलाबरोबर उकळून घ्यावे व मग खावे. उपवासाच्या पदार्थात घेण्यास हरकत नाही.
  • गाजर – गाजर हे उत्तम पोषण करणारे असे आहे. उदा. गाजराचा हलवा. पित्त प्रकृतीच्या व पित्ताचे व्याधी अम्लपित्त इ. असणाऱ्यानी सांभाळून खावी ( अति प्रमाण टाळावे ) किवा आयुर्वेदीय वैद्यांच्या सल्ल्याने वापर करावा.
  • मूळा – नेहमी कोवळा मूळा घ्यावा. जुना मूळा घेऊ नये. मूळा रात्री खाऊ नये. तसेच दुधाबरोबर खाऊ नये. तसेच मध व गुळ यांच्याबरोबरही खाऊ नये.
  • साबुदाणा – आपण खरे पाहता याची भाजी न करता याची खिचडी खातो. याचा पावसाळा व उन्हाळा यामध्ये जपून ( कमी ) वापर करावा. पचनास अत्यंत जड असतो. रात्रीच्या वेळी, जुलाब असताना साबुदाणा खाऊ नये. याचे शिळे पदार्थ टाळावेत.

पालेभाज्या

  • चाकवत – ही भाजी पथ्याची भाजी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे व म्हणून पालेभाज्यांमध्ये चाकवत ही भाजी श्रेष्ठ होय. तापानंतर, कोणत्याही आजारानंतर याची भाजी किवा सूप द्यावे.
  • पालक – ही एक बलदायक अशी भाजी आहे. बालक आणि स्त्रियांना ही भाजी अत्यंत चांगली होय. पालक याची भाजी करतांना जास्त प्रमाणात शिजवू नये.
  • मेथी – छोटी व मोठी असे हिचे प्रकार असून मोठी बळ देणारी अशी भाजी आहे. पाने व मेथ्या यांचा भाजीसाठी वापर करतात. पित्ताचे व्याधी ( अम्लपित्त, जळजळ इ. ) असणाऱ्यानी मेथीचा वापर करू नये. मधुमेही रुग्णांनी मेथीचा अतिरेक करू नये. किंवा तिच्यावरच अवलंबून राहू नये. योग्य आयुर्वेदीय वैद्याचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

भाज्यांबद्द्ल आणखी माहिती आपण पुढील लेखात जाणून घेवूयात.

– क्रमशः

– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),

CYEd, DYA, MA (Sanskrit)

अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594

For more ………

Old articles on Vegetables available …..

please see the articles on www.amrutaayurved.in

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center

Contact – 9869105594

For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in

All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594

For more informative Ayurveda articles –

www.amrutaayurved.in      http://amrutaayurvedthane.blogspot.in  https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter