काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान भाग 5

भाजी ( Vegetables ) – भाग 5

आयुर्वेदामध्ये फार प्राचीन काळापासून आहारपदार्थांचे विस्तृत वर्णन केले आहे. आहारात भाज्यांचे एक वेगळे स्थान आहे. साधारणतः आपण वापरत असलेल्या भाज्यांची यादी खालीलप्रमाणे करता येते.

  • फळभाज्या – दुधीभोपळा, लाल भोपळा, पडवळ, वांगी, तोंडली, कारली, कोबी, घोसाळी, भेंडी, दोडका, ढोबळी मिरची, फरसबी इ.
  • कंदमूळ भाज्या – बीट, गाजर, मुळा, बटाटा, रताळी, सुरण इ.
  • पालेभाज्या – चाकवत, पालक, मेथी, शेपू, चुका, माठ, लालमाठ, शेवगा, तांदुळजा, अजमोदा, अंबाडी, करडई, टाकळ, हादगा, पुनर्नवा, अळू इ.
  • कडधान्य भाज्या – मुग, मसूर, मटकी, कुळीथ, चणे, छोले, हरबरे, तूर, वाल, वाटाणा, चवळी इ.

फळभाज्या

  • दुधीभोपळा – याचे भाजीसाठी कच्चे फळच वापरावे, जुने – पिकलेले फळ वापरू नये. जुन्या भाजीने मलावरोध होतो. अतिसार, सर्दी, खोकला, दमा इ. त्रास असणाऱ्यांनी दुधी टाळावी.
  • लाल भोपळा – याचे आतील धागे पचायला जड असतात, फार जुना वापरू नये.
  • पडवळ – यामध्ये गोड पडवळ भाज्यांसाठी व कडू पडवळ औषधांसाठी वापरतात. कोवळे पडवळ भाजीसाठी उत्तम असते.
  • वांगे – कच्चे वांगे – हे पित्तनाशक असते, म्हणून खाण्यासाठी उत्तम होय. पिकलेले वांगे –  हे पित्तकर व वातप्रकोप करणारे असते. गरम मसाला घालून केलेली भरलेली वांगी नेहमी खाणे टाळावे.
  • तोंडली – गोड तोंडली भाजीसाठी वापरावीत. या भाजीबरोबर पाणी जास्त पिऊ नये. ही भाजी नियमितपणे खाण्याने बुद्धी कमी होते असे एक मत आहे.
  • कारले – ‘ कडू खा ’ अशा सल्यामुळे कारल्याची भाजी, कारल्याची चटणी, कारल्याची आमटी, कारल्याची कोशिंबीर, कारल्याचे पराठे इ. असा अतिरेक करू नये. याच्या अतिसेवनाने पित्तविकार होतात. वजन कमी होत असेल, थकवा असेल तर कारले टाळावे. सर्वच मधुमेही रुग्णांना कारल्याच्या भाजीने फायदा होत नाही. योग्य आयुर्वेदीय वैद्याचा सल्ला जरूर घ्यावा.
  • कोबी – कोबी हा चांगला भरलेला, कोवळी हिरवट, पिवळी पाने असलेला असा असावा. कोबीची भाजी करताना त्यामध्ये हिंग घालणे अत्यंत जरुरीचे असते. कधीही कच्चा कोबी खाऊ नये. पचायला जड व पोटात वायू करणारा आहे.
  • घोसाळी – गोड घोसाळी आहारात वापरावी. ही भाजी मधुमेहींना उपयुक्त अशी आहे. तसेच उष्णता व मलावरोध यांना चांगली होय.
  • भेंडी – अत्यंत पथ्यकारक भाजी. अशक्तपणा लवकर कमी करणारी ही भाजी होय. याची फळे नेहमी ताजीच वापरावीत. अति लहान किवा जुनी भेंडी वापरू नये. तसेच भाजी करताना जास्त परतू नये.
  • दोडका – याची शिरा काढून भाजी करावी. दोडक्याची टणक बी असलेली भाजी खाऊ नये. तसेच दोडका शिजवल्याशिवाय खाऊ नये. मंद भूक, आव, जुलाब असे त्रास असताना ही भाजी खाऊ नये.
  • भोपळी मिरची – या भाजीचा पंजाबमध्ये जास्त वापर करतात. ही भाजी अम्लपित्त, वायू इ करते, वरील तक्रारी असणाऱ्यानी वैद्याच्या सल्यानेच खावी. विशेषतः उन्हाळ्यात ही भाजी खाऊ नये.
  • फरसबी – फरसबी च्या जाड बिया असलेल्या शेंगा खाऊ नये. ही भाजी तेलात तळून खाऊ नये. याच्या शेंगेच्या शिरा व देठ काढून टाकावेत.

भाज्यांबद्द्ल आणखी माहिती आपण पुढील लेखात जाणून घेवूयात.

– क्रमशः

– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),

CYEd, DYA, MA (Sanskrit)

अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594

For more ………

please see the articles on www.amrutaayurved.in

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center

Contact – 9869105594

For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in

All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594

For more informative Ayurveda articles –

www.amrutaayurved.in      http://amrutaayurvedthane.blogspot.in  https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter