काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 7
घरी फळांचा रस काढण्याबद्दल थोडेसे –
- प्रथमतः फळे ताजीच घ्यावीत. फळावरील किटकनाशक इ चे अंश भरपूर पाण्याने धुतल्याशिवाय जात नाहीत. शक्य झाल्यास फळे नळाखाली धरूनच धुवावीत. फळांच्या देठाजवळ, बुडख्याजवळ ही द्रव्ये साचून राहिलेली असतात. ती घासून स्वच्छ धुवावीत.
- साल कडक, टणक, जाड असल्यास ती काढून टाकावी. उदा. जसे संत्रे.
- मऊ सालीच्या फळांची साल काढण्याची प्रायः आवश्यकता नसते. जसे द्राक्षे इ.
- फळातील बी काढून टाकावे अन्यथा रस कडू होतो. ( पण म्हणून बियाविरहित / सीडलेस फळे शक्यतो खरेदी करू नयेत. त्यामुळे हाडांचे रोग , हार्मोनल, वन्ध्यत्वासारख्या समस्या समाजात वाढत चाललेल्या दिसत आहेत. – याचे स्पष्टीकरण पुन्हा केव्हातरी….) ( तसेच कंपन्यांमध्ये असे ज्यूस तयार होत असताना ती बियांसकट टाकली जात असणार, त्याने आलेला कडूपणा नंतर टाकलेल्या साखरेमुळे जाणवत नाही. )
- ज्यूसर, मिक्सर यांची भांडी अलुमिनियम, प्लास्टिक ची नसावीत याची काळजी घ्यावी.
- तयार झालेला लगदा, रस शक्यतो कपड्याने गाळावा.
- हा तयार झालेला रस शक्यतो एक तासाच्या आत घ्यावा. फ्रीजमध्ये ठेवून नंतर काही तासांनी किवा दुसऱ्या दिवशी घेणे योग्य नाही. थंडीमध्ये हा रस २ – ३ तास टिकू शकतो पण उन्हाळ्यात एक तासाच्या वर रस ठेऊ नये तो ताजाच घ्यावा.
फळांविषयी आणखी माहितीसाठी आयुर्वेदीय वैद्य / डॉक्टर सदैव तुमच्या मदतीसाठी तयार असतात. त्यांच्याशी संपर्क साधावा.
फळांविषयी आणखी माहिती आपण पुढील लेखात जाणून घेवू. -क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits available
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchakarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –