काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 5
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
मागील लेखांचा सारांश जर आपण पाहिला तर शेवटी लक्षात येते –
- दुध व फळे एकत्र खाऊ नये.
- डबाबंद फळे खाऊ नयेत.
- आईस्क्रीम, फ्रुट सलाड, मिल्क शेक इ. शक्यतो टाळलेलेच बरे.
- केळी-शिकरण खाऊ नये किंवा वेळ-काळ, भूक-पचनशक्ती बघून दुधाऐवजी तुपाबरोबर खावे.
- फळे ही जेवणाच्या सुरुवातीस खावीत.
- फळे ही काच, स्टील, माती, कलईदार भांड्यातून खावी. प्लास्टिक, अॅल्युमिनियम इ भांडी वापरू नये.
- फळे ही संध्याकाळी खाऊ शकतो.
- फळे शक्यतो ऋतुकालोद्भव खावीत. म्हणजे ज्या ऋतूत जी फळे येतात ती फळे खावीत. (वर्षभर आंबा खाऊ नये.)
आणखीनही बरेच मुद्दे आपण फळांविषयी जाणून घेण्यासारखे आहेत. पण ते पुन्हा केव्हातरी.
आता आपण सुरुवातीस काही फळांची नावे उदाहरण म्हणून पाहू. द्राक्षे, डाळिंब, केळी, सफरचंद, अननस, मोसंबी, संत्रे, नारंगी, नारळ, आंबा, लिंबू, इडलिंबू, खजूर, आवळा, कलिंगड, चिंच, पपई, काकडी, सीताफळ, रामफळ, पेरू, बोर, अंजीर, करवंद, पीच, चेरी, स्ट्रॉबेरी, पेर, ताडगोळा, आमसूल (कोकम) इ. अनेक फळे आपण खात असतो. कदाचित अजूनही बरीच फळे उल्लेख करायची राहून गेली असतील पण उदाहरण म्हणून आपण ही यादी बघितली.
वरील फळांची लिस्ट बघता असे लक्षात येते कि भरपूर पर्याय (ऑप्शन) आपल्याला उपलब्ध असतात. प्रयत्न केल्यास वरील प्रकारे अनेक फळे आपल्याला उपलब्ध होऊ शकतात.
फळांचे वरीलप्रमाणे अनेक दुष्परिणाम आपल्याला पहायला मिळतात, त्यावरील उपायांसाठी आयुर्वेदीय वैद्य / डॉक्टर सदैव तुमच्या मदतीसाठी तयार असतात. त्यांच्याशी संपर्क साधावा.
फळांविषयी आणखी माहिती आपण पुढील लेखात जाणून घेवू. -क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
Old articles about vegetables and fruits available