काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 17
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
जांभूळ
जास्तकरून पावसाळ्याच्या सुरुवातीला याची टपोरी/ मोठी, जांभळ्या रंगाची फळे बाजारामध्ये विकायला येतात. गोड, तूरट चवीचे असे हे फळ असून सर्वांना आवडेल असेच आहे. परंतु याचा अतिवापर टाळावा. आजकाल जांभूळ याचा उपयोग मधुमेहाचे रुग्ण भरपूर प्रमाणात करताना आढळतात. जुन्या काळापासूनच अनेक रोगांमध्ये या फळाचा उपयोग केला जातो.
कच्चे / अपक्व फळ
- कच्च्या / अपक्व फळाचा रस व मीठ असे मिश्रण करून याने गुळण्या कराव्या यामुळे तोंड येणे, दात हालणे, हिरड्या ढिल्या होणे, तोंडातील / हिरड्यातील रक्तस्त्राव इ तोंडातील विविध तक्रारींमध्ये फायदा दिसून येतो.
- तुरटी व कच्च्या / अपक्व फळाचा रस यांचा वापर श्वेतप्रदर/ पांढरे जाणे, भ्रंश इ तक्रारींमध्ये उपयोग होतो.
- जुलाब तसेच आव पडणे या तक्रारींमध्ये कच्च्या / अपक्व फळाचा रस व ताक असे मिश्रण घेतल्याने फायदा होतो.
पिकलेले / पक्व फळ
- पिकलेल्या / पक्व फळाचा रस आल्याच्या रसाबरोबर घेतल्यास भूक लागत नसल्यास फायदा होतो.
- हातापायांची आग होणे, डोळ्यांची जळजळ इ तक्रारींमध्ये पिकलेल्या / पक्व फळाचा रस व मध असे मिश्रण घेतल्याने उपयोग होतो.
- ताज्या पिकलेल्या / पक्व फळाचा रस लोखंडी भांड्यातून घेतला असता रक्ताची कमतरता असणाऱ्याना फायदा होतो.
- यकृत विकारामध्येही आवळ्याबरोबर खाल्याने उपयोग होतो.
पानांचा रस
- जास्त लघवी होत असल्यास पानांचा रस पोटात घ्यावा.
- पानांचा काढा करून गुळण्या केल्याने पडजीभेची सूज इ विकारांत उपयोग होतो.
सावधानता
या फळाचा अति वापर टाळावा. मलाचा विबंध (मलावरोध constipation), शुक्राची कमतरता,थकवा इ असल्यास या फळाचे सेवन टाळलेलेच बरे. याच्या अतियोगाने घसा व फुफुसे यांच्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी जांभळे ही मिरे तसेच सैंधव यांच्या बरोबर खावीत म्हणजे जास्ती दुष्परिणाम दिसत नाहीत.
–क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchakarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –