काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 14
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ. क्रमशः …
आंबा –
काळजी – आंबा खाताना कोणती काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊ.
जास्त प्रमाणात आंबे खाण्यापेक्षा – आंबे स्वच्छ न धुता पोटात जाणे, हात अस्वच्छ असणे यामुळे जुलाब होऊ शकतात, पोटात आव होऊ शकते म्हणून आंबा नळाखाली स्वच्छ धुवून मगच खावा.
आंब्यासह गाईचे तूप, सुंठ, ओवा, काळीमिरी, सैंधव, कटाची आमटी असे काहीतरी पचनास मदत करणारे / पाचक असणारे पदार्थ जरूर खावेत. म्हणजे नुसते आंबे, आमरस खाण्याने होणाऱ्या त्रासापासून बचाव करता येतो.
आंब्याचा रस फडक्यातून गाळून, पिळून घ्यावा म्हणजे यातील धागे दोरे, रेषा निघून जातात व या रेषांमुळे पोटात दुखणे, अस्वस्थपणा जाणवणे, जुलाब होणे या तक्रारी कमी होतात. गाळून घेतलेल्या रसात चवीप्रमाणे सुंठ, वेलची, जायपत्री इ घालावी, याने उत्तम फायदे मिळतात.
आंब्याच्या नित्य उपयोगाने त्वचा चमकदार व सौन्दर्ययुक्त होते. आंब्याच्या ओल्या साली स्नानापूर्वी सर्वांगास चोळाव्या, याने मुरूम पुटकुळ्या न येता त्वचा निरोगी राहते.
आम्रबीज –
हे आंब्याचे बी असून वरून तंतुयुक्त आवरण असते व अत्यंत कठीण असते. आतमध्ये पांढरट, हिरवट रंगाची मज्जा असते. मज्जा खाल्यास चव तुरट लागते. ही कोय वाटून ताकासह घेतल्यास जुलाब, आव पडणे कमी होते. याचा कल्क पोटावर लावल्याने पोटाचा क्षोभ कमी होतो. योनीमार्गातून पांढरे जाणे, लाली, कंड येणे, तसेच योनिशिथिलतेत याच्या काढ्याच्या धावनाने फरक पडतो. अतिजुलाबाने गुदमार्ग बाहेर येणे या विकारात याचा चांगला उपयोग होतो. कोय वाळवून चूर्ण करून त्याने दात घासल्यास हिरड्यातून रक्त येणे, पु होणे, हिरड्या ठिसूळ होणे इ तक्रारी कमी होतात. थुंकीतून रक्त जाणे, नाकातून रक्त येणे अशा तक्रारींसाठी सुद्धा हे चूर्ण उपयोगी पडते. ( शेवटी सर्वच रोगांमध्ये माहित असलेल्या गोष्टींचा सुद्धा आयुर्वेदीय वैद्यांच्या सल्ल्यानेच वापर करावा. त्यामुळे वेळ, पैसा, व रोगाचे बळावणे / वाढ ही आपण वाचवू शकतो )
वारंवार होणाऱ्या गर्भपातावर सुद्धा या बीच्या पासून निघणाऱ्या तेलाचा उत्तम उपयोग होतो.
-क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchakarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –