काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

फलवर्ग

फळे ( Fruits ) भाग 10

फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.

नारळ

नारळातील खोबरे मलइ व जाड – कोरडे असे दोन अवस्थांमध्ये मिळते. त्यातील मऊ (मलइ) असणारे खोबरे शक्तिवर्धक, मांसवर्धक, लहान मुलांना योग्य पोषण देणारे असे असते. त्याच्या लेपाने चेहऱ्याच्या स्नायूंना बळ मिळून अकाली सुरकुत्या पडत नाहीत. जाड खोबरे पचायला जड असते. पण त्याने मुखशुद्धी होऊन दाट बळकट होणे, हिरड्यांना बळ मिळणे व सारखे सारखे तोंड येणे या तक्रारी दूर होतात. हे खोबरेही अत्यंत पौष्टिक असते. लहान मुलांना चॉकलेट किंवा इतर गोळ्यांपेक्षा गूळ किंवा साखर इ गोष्टींबरोबर खोबरे दिल्यास त्यांचे पोषणही होते व पोटात जंत होणे वगैरे तक्रारीही होत नाहीत. नारळाच्या वड्या हा प्रचलित पदार्थ चवीला खूप सुंदर लागतो.

नारळाचे पाणी हे उन्हाळ्यात किंवा तहान लागलेली असताना उत्तम तृष्णाशामक म्हणून काम करते. आजकाल मॉलमध्ये कोकाकोला किंवा इतर कोल्ड्रिंक चा वापर प्रचंड प्रामाणात दिसतो. स्वदेशी चलन प्रचंड प्रमाणात परदेशात जाताना दिसते. या आरोग्यास हानिकारक कोल्ड्रिंक चा वापर करण्यापेक्षा या अमृतासारख्या पेयाचे मार्केटिंग व्हावे ही काळाची गरज आहे. अर्थात अतिप्रमाणात वापरही टाळावा. किडनीच्या रोग्यांनी वैद्याच्या सल्ल्यानेच वापर करावा. लघवीस जळजळ होणे, तसेच मानसिक श्रम कमी करण्यासाठी शहाळ्याचे पाणी खूप उपयुक्त ठरते. खोबऱ्यापासून निघणाऱ्या तेलाचे तर भरपूर उपयोग सांगता येतील. या तेलाने सर्वांगास अभ्यंग केल्याने त्वचा, मांस बळकट होऊन प्रसन्नता वाढते, उत्साह टिकून राहतो, अन्नामध्ये सुद्धा याचा वापर करता येतो. अशा प्रकारे सर्वतोपरी मानवाला उपयोगी पडणारा असा हा फळाचा प्रकार आहे.

पपई –  

पपई हे फळ उष्ण असून पचनास सहाय्य करणारे असे आहे. याच्या सेवनाने पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत होते. १ ते २ फोडीच खाव्यात, याचे अतिप्रमाण टाळावे. याच्या उपयोगाने पोटातील जंत होण्याची सवय नाहीशी होते. बाळंतिणीस जेवणानंतर पपई द्यावी याने वात शांत होतो व दूधही भरपूर येण्यास मदत होते. या फळाच्या बियांचा सुद्धा उपयोग जंत नाशनासाठी करता येतो. झाडाच्या चिकाचा / दुधाचा उपयोग पोटाच्या विकारांमध्ये करता येतो. आजकाल या झाडाच्या पानांचा उपयोग डेंगू या तापामध्ये प्लेटलेट या पेशींची संख्या वाढवण्यासाठी केला जातो. परंतु वरील सर्व उपाय आयुर्वेदीय वैद्याच्या सल्ल्याने आपली प्रकृती इ ठरवून मगच करावा. म्हणजे अपाय टाळला जाऊ शकतो. गर्भिणी स्त्रीने पपईचा उपयोग करू नये. पिकलेल्या पपईशिवाय  त्याच्या इतर गोष्टी या अतिशय उष्ण व तीक्ष्ण आहेत म्हणून जपून वापर करावा.

-क्रमशः

                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),

CYEd, DYA, MA (Sanskrit)

अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594

For more ………
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in
 
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –