काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 22
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
पेरू –
पेरू हे फळही अत्यंत लोकप्रिय असे फळ आहे. पेरूचे झाड हे सदैव हिरवे राहणारे असे झाड आहे. पेरू कच्चा असताना हिरवा व पिकल्यावर बाहेरून पिवळा असा दिसतो. कच्चा पेरू हा तूरट अश्या चवीचा असतो, तर पिकलेला पेरू हा गोड लागतो. कच्चा पेरू कधीही खाऊ नये. कच्चा पेरू खाण्याने पोटात दुखण्याची शक्यता असते. औषधासाठी पेरूची पाने, फुले, खोड, व फळ इ गोष्टी वापरल्या जातात.
पेरूचे फळ –
पिकलेले फळच खाण्यासाठी वापरावे.
तसेच पेरूचे फळ हे शक्यतो बी काढून खावे.
- हातापायांची आग, घसा कोरडा पडणे, पोटामध्ये आग, जळजळ होणे इ तक्रारींसाठी जेवणानंतर सुमारे एक तासाने पेरू खावा. मात्र येथे मळमळ होणारे पित्त व उष्णता असता कामा नये तरच लाभ दिसून येतो.
- मलावष्टम्भाचा त्रास असणार्यांना पेरू ( पिकलेले ) या फळाचा उत्तम उपयोग होतो.
- पायाच्या पोटऱ्या दुखणे, थोडेसे चालल्याने दम लागल्यासारखे वाटणे यासाठी पिकलेल्या पेरूच्या फळाचा उत्तम उपयोग होतो.
- मोठ्या शस्त्रक्रियेनंतर ( जखम पूर्ण भरून आल्यावर ) किंवा मोठ्या आजारातून पूर्णपणे बाहेर आल्यावर आलेला अशक्तपणा घालवण्यासाठी पिकलेल्या पेरूचा वापर करता येतो.
- लहान मुलांना ( सर्दी इ कफाचे त्रास नसतानाच ) पेरू हे फळ दिल्याने शक्ती येते.
पेरूची पाने –
- हिरड्या व घसा यांच्या सुजेमध्ये पेरूच्या पानांचा काढा करून गुळण्या कराव्यात , सूज कमी होताना दिसते.
- दात स्वच्छ रहाण्यासाठी पाने चावावीत, रस व चोथा थुंकून द्यावा.
- तोंड येणे, तोंडात जखम होणे यामध्येही जखम लवकर भरून येण्यास ही पाने मदत करतात.
- मलावरोध होत असल्याने जेव्हा शौचाची जागा बाहेर येते म्हणजे प्रोलाप्स होते तेव्हा पेरुच्या पानांचा रस कापसाने लावावा. ( सोबत इतरही वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
- त्वचारोगांमध्ये खरुजासारखे त्वचारोग होत असताना , त्यामध्ये जास्ती स्त्राव येत असताना पेरूच्या पानांचा रस व हळद लावावी. म्हणजे स्त्राव कमी होण्यास मदत होते.
- पेरूच्या पानांचा रस व लिंबाचा रस लावल्याने केसाच्या तक्रारी कमी होतात. केसांमध्ये कोंडा, उवा, लिखा इ होणे यासाठी वरील प्रकारे लावण्याचा फायदा होतो.
सावधानता–
- सर्दी – खोकला इ कफाचे विकार असताना पेरूचा वापर करू नये , अन्यथा रोग बळावून कफाचे दुर्धर रोग होतात.
- कच्चा पेरू कधीही खाऊ नये.
- थंडीच्या काळातही पेरू खाऊ नये.
- पेरूचे बी काढूनच शक्यतो पेरू खावा, नाहीतर पोटात दुखण्याची शक्यता असते.
–क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchakarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –