पावसाळा , आयुर्वेद, उपवास, इम्युनिटी
आपल्याकडे सर्वात जास्त उपवास हे चातुर्मास (चार महिने) याचं काळात जास्ती सांगितलेले आहेत. (एकादशी , श्रावण सोमवार इत्यादी अनेक).
तांदूळ, डाळ इ धान्य भाजले की त्यातील पाणी, ओलावा कमी होतो. असे भाजलेले धान्य पचायला हलके होते ,म्हणून केवळ *भाजलेल्या धान्यापासून बनवलेले पदार्थ* खाऊन काही उपवास या काळात केले जातात. (उदा. उपवासाचे भाजणीचे पदार्थ)
या काळात वातावरणात आर्द्रपणा, ओलावा वाढतो त्यामुळे पाणी न पिता करण्याचा उपवास म्हणजे निर्जला एकादशी ही सुद्धा याचं काळामध्ये येते. ( *म्हणजेच पावसाळ्यात पाणी कमी लागते / पुरते , पाणी कमी प्यावे*)
पावसाळ्यात मीठ हेही पाणी शोषून घेते, धरून ठेवते व शरीरात ओलावा वाढवते, म्हणून काही उपवास निर्लवण म्हणजे बिनमीठाचे राहून केले जातात. ( *म्हणून पावसाळ्यात मीठ कमी खावे* )
पावसाळ्यातील वाढलेली दलदल, दूषित पाणी यामुळे पाण्यातील वेगवेगळे जीवजंतू ,डास इ यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या काळामध्ये सर्दी ,ताप, खोकला ,दमा ,
जुलाब, पोटदुखी, सांधेदुखी असे अनेक संसर्गजन्य रोग या काळात उद्भवतात
म्हणूनच रुढीपरंपरांच्या माध्यमातून वरीलप्रमाणे योग्य आहार इ नुसार आरोग्य रक्षणाचा किती सुंदर प्रयत्न आपल्या पूर्वजांनी करून ठेवला आहे.
वातावरणात वाढलेला ओलावा ,थंडावा आणि मंद झालेला अग्नि(भूक) या सगळ्याचा विचार केला तर पावसाळ्यात पचायला हलका, गरम ,ताजा, मीठ कमी असलेला आणि विशेषतः भाजलेल्या पदार्थांचा समावेश असणारा असा आहार घेणे हे नक्कीच *इम्युनिटी वाढवणारे* ठरते.
– डॉ आनंद कुलकर्णी,
अमृता आयुर्वेद, ठाणे
8779584840
अधिक लेखांसाठी पहा
www.amrutaayurved.in