नेत्रतर्पण डोळ्यांसाठीचे आयुर्वेदिक पंचकर्म
डॉ आनंद कुलकर्णी (MD Ayu.Med.)
डॉ अमृता कुलकर्णी, (BAMS,PGDEMS)
नेत्र म्हणजे डोळे / Eyes आणि तर्पण म्हणजे पोषण / Nourishment. नेत्रतर्पण म्हणजे आपल्या डोळ्यांचे पोषण करणे होय.
तर्पण क्रिया काय आहे ? ती कशा प्रकारे केली जाते ?
प्रथमतः डोळे कोष्णजलाने स्वच्छ केले जातात. नंतर उडदाच्या पीठाचे पाळे डोळ्यांभोवती केले जाते किंवा विशिष्ट प्रकारचा चष्मा घालून त्यात औषधिनी सिद्ध केलेले तूप ओतले जाते. रुग्णाला / व्यक्तीला डोळ्यांची हळुवार उघडझाप करायला सांगितली जाते. हि प्रक्रिया १५ ते 20 मिनिटे केली जाते. डोळ्यांचा स्थानिक मसाज केला जातो व डोळे कोमट पाण्याने धुवून घेवून स्वच्छ केले जातात.
तर्पण क्रियेसाठी खूप वेळ द्यावा लागेल का ? नाही , तर्पण क्रियेसाठी आपणास फक्त आणि फक्त अर्धा तास वेळ काढावा लागणार आहे.
तर्पण क्रिया कधी करावी ? तसे तर आपण तर्पण कधीही करू शकतो मात्र सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेत केल्यास शास्त्राप्रमाणे जास्त फायदा होतो.
तर्पण किती वेळा करावे ? तर्पण ही क्रिया डोळ्यांच्या संरक्षणासाठी आणि नेत्ररोगात उपचारासाठी म्हणून केली जाते. दृष्टी दोष होऊच नये असे ज्यांना वाटते त्यांनी महिन्यातून एकदा तरी करावे किंवा कमीतकमी वर्षातून एकदा तर केलेच पाहिजे. नेत्ररोगासाठी उपचार म्हणून तर्पण करत असताना तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करावे.
नेत्रतर्पण कोणासाठी योग्य आहे ?
कुणालाही ज्यांना
- डोळे रुक्ष / कोरडे झाल्यास
- तिरळेपणा
- नेत्रावर ताण जाणवतो, प्रकाश असहिष्णुता
- जे चष्मा वापरतात,
- दृष्टीदोष असणार्यांना
- मोबाईल, कॉम्पुटर, टिव्ही वापरणारे
- दृष्टीसंबंधी कोणताही त्रास असल्यास
- दृष्टीपटलाचे विकार असल्यास
- Diabetic Retinopathy
- वयानुसार होणारी दृष्टीहानी
तर्पण कोणासाठी अयोग्य आहे ?
अयोग्यता हि तुमचे वैद्य नेत्रतपासणी करून ठरवतील, शक्यतो – ज्यांना डोळ्यांचा जंतुसंसर्ग झाला आहे, डोळे जास्त लालसर झाले आहेत, डोळ्यातून पुय सदृश स्त्राव येत आहे, डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर लगेचच तर्पण करू नये.
नेत्रतर्पणाचे फायदे काय आहेत ?
- तर्पणामुळे डोळ्यांची ताकत वाढते
- डोळ्यांचे पोषण होते
- दृष्टीचे संरक्षण होते.
- डोळ्यांना हलकेपणा जाणवतो
- छान तणावरहित झोप लागते
- डोळ्यातील घाण साफ होते
- नियमित नेत्रतर्पण केल्यास चष्म्याचा नंबर कमी करता येतो किंवा कमी असल्यास घालविताही येतो
- मधुमेहामुळे आपल्या डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम नेत्रतर्पणामुळे टाळता येतात
तर्पणाचे काही दुष्परीणाम आहेत का?
तर्पण क्रिया ही खूप काळजी घेऊन व स्वच्छतापुर्वक केली जाते आत्तापर्यंत एकाही व्यक्तीला तर्पणामुळे त्रास झालेला नाही. तर्पण क्रियेसाठी वापरले जाणारे घृत योग्य परीक्षण तथा लॅब टेस्ट करूनच वापरतात.
तर्पण केल्यानंतर काय करावे ?
१/२ तास विश्रांती घ्यावी. बाहेर जाताना Sunglasses चा वापर करावा. नेत्रतर्पण केल्यावर काही काल तुम्हाला डोळे चुरचुरणे व पाणी येणे ही लक्षणे जाणवू शकतात पण ही प्राकृतिक लक्षणे असून यामुळे डोळे स्वच्छ होतात. काहीही त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क करावा.
तर्पण केल्यानंतर काय करू नये ?
डोळे चोळू नये. प्रखर सूर्यप्रकाशात जाऊ नये. गर्दीत जाणे टाळावे. धुळीपासून संरक्षण करावे. पोहणे टाळावे.
तर्पण साठी लागणारा खर्च किती ? खूप खर्चिक आहे का ?
तुमच्या Monthly Mobile रेचार्ज पेक्षा जास्त नक्कीच नाही.
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर A-२ / 305, नागेश टॉवर, हरिनिवास, नौपाडा, ठाणे प. Ph. 9869105594
Please visit to Amruta Ayurved Thane for expertise opinion about your Health problems.
Dr Anand and Dr Amruta Kulkarni
Amruta Ayurved Panchkarma Center
Authorized sub center of Keshayurved
A-2 / 305, Nagesh Tower, Hariniwas, Naupada, Thane west
9869105594
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about other diseases, vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchakarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –