ध्वनी प्रदूषण आणि आयुर्वेद part 3

योग – 

  • योगासने

‘स्थिर सुखं आसनं’ – स्थिर आणि सुखकारक असे आसन असावे. मग ते कोणतेही आसन असो. शरीर व मन शांत व स्वस्थ राहण्यासाठी योगासनांची आवश्यकता असते. यामध्ये सूर्यनमस्कार यांचे जास्ती महत्व आहे. कारण त्यामुळे शारीरिक व अध्यात्मिक उन्नती होण्यास मदत होते. या उपायांनी प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम, तणाव नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

  • प्राणायाम

प्राणायामामुळे सर्व शरीरातील्प्रानावायू नियंत्रित व सुस्थितीत राहतो. कान इ इंद्रीयांवरही ताबा मिळवता येतो, त्यांच्यामधील प्राणाचा संचार सुधारल्यामुळे तणाव कमी राहातो. बल वाढून अधिक आवाज सहन करण्याची क्षमता निर्माण होण्यास मदत होते.

  • धारणा

धारणा म्हणजे इंद्रिय शक्तींचे नियंत्रण. या योगातील विशिष्ट अंगाचा विचार कर्ण या इंद्रियाच्या धारणशक्तीसाठी, सहनशक्तीसाठी करून घेता येतो. दुर्लक्षित परन्तु अत्यन्त महत्वाचे असे हे अंग मार्गदर्शनाखाली केल्यास भरपूर लाभ होऊ शकतो.

  • शवासन

योगामधील हि एक तणाव कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी पद्धत आहे. यामध्येच शरीरासह सर्व इंद्रियांच ताण कमी करता येतो.

  • योगनिद्रा

हि सुद्धा योगामधील तणाव मुक्तीसाठी अत्यंत महत्वाची साधना म्हणता येईल. यामुळे निश्चितपणे ताणतणावापासून मुक्ती मिळू शकते. सद्य लेखक / आयुर्वेदीय वैद्य किंवा योगशिक्षक यांच्या सहाय्याने यामध्ये प्राविण्य मिळवता येऊ शकते.

  • पॉवर नॅप

प्रदुषणामुळे येणारा ताणतणाव कमी करण्यासाठी एक छोटी डुलकी किंवा पावर नॅप (मेंदू ताजा तरतरीत करून ) आवश्यक असते. मात्र ही डुलकी १५ ते २० मिनिटांची असावी. पॉवर नॅपमध्ये काही काळ विचार बंद करण्याची क्रिया घडत असते. रात्रीची झोप ही दीर्घ तासांची असते. त्यामुळे अनेकदा सकाळी आळसटल्यासारखे वाटते. मात्र पॉवर नॅपमुळे तरतरी येते. दिवसातील कामाच्या ताणामुळे थकवा आल्यास किंवा आळसटल्यासारखे वाटत असेल तर पॉवर नॅप घ्यायला हरकत नाही. यामुळ शरीर नैसर्गिकरीत्या जी झोपेची किंवा आरामाची मागणी करत असते ती पूर्ण होते.

  • संगीतोपचार

संगीताचाही पर्याय कानांचा ताण कमी करण्यासाठी उपलब्ध आहेच. नको असलेले ध्वनी ऐकून आलेल्या ताणावर उपाय म्हणून मधुर किंवा ऐकावे वाटणारे संगीत, मंत्र इ श्रवण केल्यास निश्चितच फायदा होतो. मन शांत, प्रसन्न होते व जीवन आनंदी होते.

अशा प्रकारे वरील उपायांनी आपण ध्वनी प्रदूषण तसेच अन्यही गंभीर प्रदुषणावर मात करू शकतो. यात आयुर्वेद व आयुर्वेद वैद्य आपल्याला सर्वतोपरी मदत करू शकतात. त्यांच्याशी प्रतिबंधात्मक योजनेसाठी तरी अवश्य भेट द्यावी.

– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),

                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)

अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594

For more ………
Old articles about vegetables, fruits…………. available

please see the articles on www.amrutaayurved.in

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center

Contact – 9869105594

All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594

For more informative Ayurveda articles –

www.amrutaayurved.in

http://amrutaayurvedthane.blogspot.in

https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter