ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सामान्य उपाय 

  • शहरातील वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उड्डाणपूल व इलिव्हेटेड रोडवर आवाज प्रतिबंधके लावली गेली पाहिजेत. पुलांच्या कठड्यांभोवती फायबरचे सात फूट उंचीचे अडथळे उभारले की आवाजाची तीव्रता कमी होते. इमारत व उड्डाणपूल यांच्यातले अंतर ३० मीटरपेक्षा कमी असेल तर फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूला सात फूट उंचीची आवाज प्रतिबंधके उभारली जातात.
  • रस्त्यांच्या दुतर्फा मोठी, घनदाट व उंच अशी झाडे लावल्यास ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होते. विशेषतः हि झाडे आयुर्वेदिक असतील तर त्याचा समाजाला आणखीनच फायदा होईल.
  • कायद्यानुसार भारतात सर्वोच्च न्यायालयाने कानठळ्या बसविणाऱ्या १२५ डेसिबल्सपेक्षा मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली पाहिजे ब त्याचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे.
  • ध्वनी प्रदूषणाविरोधात लोकांमध्ये जनजागृती करणे.
  • ध्वनी प्रदूषणाचा प्रत्येक नियम गंभीरतेने पाळणे.
  • कमी आवाज करणाऱ्या वाहनांचा वापर करणे.
  • रुग्णालये, शाळा इ ठिकाणी वाहनांचा आवाज जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • घरात किंवा बाहेर बाहेर मोठा आवाज करणार्यां उपकरणांचा कमी प्रमाणात उपयोग करावा.
  • आवाजाच्या योग्य नियोजनाने ध्वनी प्रदूषणापासून मुक्ती मिळू शकते.

आयुर्वेदिक उपाय

आयुर्वेदाच्या सहाय्याने ध्वनी प्रदूषणाच्या परिणामांवर काही उपाय करता येऊ शकतात. या प्रदूषणामुळे झालेल्या रोगांवर योग्य उपचार आयुर्वेदाने करता येतील तसेच बहिरेपणा इ येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायही आयुर्वेद खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतो.

आता आपण क्रमाने एक एक उपाय पाहू –

  • शिरोधारा

शिरोधारा म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये काही काळ सातत्याने तेलाची किंवा औषधी काढय़ाची धार सोडणे होय. यामुळे मेदुवरील तसेच सर्व इंद्रीयांवरील ताण कमी होऊन तणाव मुक्ती होते. कानावर पडणार्या कर्णकर्कश ध्वनीचा दुष्परिणाम त्यामुळे कमी ठेवण्यास मदत होते. हृदयावर ताण येणे व उच्च रक्तदाब यासाठीही शिरोधारा उपयुक्त ठरते. अर्थात प्रकृतीनुसार त्यातील द्रव्ये / औषधे बदलतात.

  • नस्य

नस्य म्हणजे पंचकर्मातील पाच कर्मांपैकी एक कर्म होय. दिनचर्येमध्ये दंतधावनानंतर ‘नस्य’ म्हणजे नाकात औषधी तेलाचे थेंब टाकण्यास सांगण्यात आले आहे. ज्या आजारांचा मेंदूशी जवळचा संबंध आहे अशात (पक्षाघात , अर्दीत (facial palsy) याचा बराच चांगला उपयोग होतो. हे वैद्यकीय सल्ल्यानुसार शिकून घेऊन करता येते. मानेच्या वरच्या भागाच्या व्याधींसाठी (उदा. सर्दी, अ‍ॅलर्जी) त्याची मदत होते. नस्यामुळे मेंदूवरचा ताण कमी करुन त्यास पोषण मिळते. तसेच उर्ध्वजत्रुगत सर्व इंद्रियांचे आणि अवयवांचे कार्य सुधारते.

  • कर्णपुरण

कर्णपुरण कानात कोमट तेल घालणे. कान हा मुख्यतः वाताचा अवयव आहे. ताण किंवा कोरडेपणा यामुळे त्याच्या ठिकाणचा वात वाढून बधीरपणा किंवा ऐकायला कमी येणे, कर्णक्ष्वेड, कर्णनाद इ तक्रारी उद्भवू शकतात.

  • शिरोबस्ती

शिरोबस्ती यात डोक्यावर तेल धारण करायचे असते. विशिष्ट प्रकारची टोपी डोक्यावर घालून काही काळासाठी त्यात तेल सोडतात.

  • नेत्रतर्पण

नेत्रतर्पण यामध्ये डोळय़ांवर काही काळ औषधी तूप इ धारण केले जाते. डोळ्यांचा तणाव डोळय़ांतून पाणी येणे, डोळे दुखणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात. यासारख्या तक्रारींवर नेत्रतर्पण अति उत्तम काम करते. डोळे शांत झाल्यानेही कानांच्या ताणासाठी मदत होते.

  • सर्वांग स्नेहन स्वेदन

सर्वाग अभ्यंग व सर्वांगाला वाफ घेण्यानेही ताणतणाव कमी होतात.

  • शरीरशुद्धी

आहाराद्वारे, पाण्याद्वारे, हवेद्वारे आपल्या शरीरात अनेक विषद्रव्ये प्रवेशित होत असतात. घामामार्फत बरीचशी विष द्रव्ये शरीराबाहेर जात असून सुद्धा मलमुत्रांचे काम रोज अगदी १०० टक्के होतेच असे नाही. त्यातूनच मग हळूहळू शरीरात विषद्रव्ये साठत जातात आणि वजन वाढणे, अनुत्साह, कान डोळे इ इंद्रियांची दुर्बलता, त्यांचे काम कमी होणे इ दुष्परीणाम सूरू होतात. अशावेळी नुसत्या औषधानी त्रास कमी करण्या ऐवजी शरीरात साठून असणारी विषारी द्रव्ये शरीराबाहेर काढून टाकणे हाच समूळ रोगमुक्तीचा उपाय ठरू शकतो. पंचकर्मातील वमन, विरेचन, बस्ती आणि इतरही अनेक उपक्रमांमधून कफ पित्त वात या दोषांचा समतोल आपण मिळवू शकतो. आरोग्य स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी, प्रदूषणाशी लढा देण्यासाठी, रोग नसताना सुद्धा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व योग्य आयुर्वेदीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली  पंचकर्म करणे हि काळाची गरज होत आहे असे दिसून येते.

अशा या आयुर्वेदिक पंचकर्म यामधल्या शरीरशुद्धीच्या सर्व उपायांनी कोणत्याही प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

  • शिरोअभ्यंग

शिरःअभ्यंग म्हणजे डोक्याचा मसाज करणे. यामुळे डोके शांत राहून तणाव कमी होऊन झोप शांत लागण्यास मदत होते. दररोज किमान एकदा सकाळी किंवा संध्याकाळी डोक्याला तेल लावणे आवश्यक असते.

  • पादाभ्यंग

पादाभ्यंग म्हणजे पायाला मसाज करणे होय. पाय हा अवयव शरीराला सगळीकडे वाहून नेणारा व भार सहन करणारा आहे तसेच वात वृद्धीने पाय दुखून शांत झोपेला अडथळा निर्माण होतो. शांत झोप होणे हे तणाव मुक्ती साठी आवश्यक आहे. तणाव नाहीसा झाला तरच आपण प्रदूषण या समस्येशी लढा देऊ शकतो.

– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),

                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)

अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594

For more ………
Old articles about vegetables, fruits…………. available

please see the articles on www.amrutaayurved.in

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center

Contact – 9869105594

All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594

For more informative Ayurveda articles –

www.amrutaayurved.in

http://amrutaayurvedthane.blogspot.in

https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter