काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

फलवर्ग  

फळे ( Fruits ) भाग 25

फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.

चिंच –

      चिंचेची झाडे सर्व हिंदुस्तानभर दिसतात. पाने छोटी छोटी असतात. कच्ची फळे आतून हिरवी असतात तर पिकलेले फळ लाल तांबूस रंगाचे असते. कच्ची चिंच अत्यंत आंबट असते. यामुळे शरीरातील पित्त अत्यंत वेगाने वाढते. चिंचेची आंबट चव तोंडाला तसेच शरीरातील सर्व अवयव, स्त्रावी ग्रंथी यांचा स्त्राव वाढवते.

परंतु चिंचेचा अति अधिक वापर करू नये. यामुळे दात आंबणे, घसा सुजणे इ त्रास होऊ शकतात. मांस शिजवताना कच्ची वा पिकलेली चिंच घालावी म्हणजे ते नीट शिजून पचायला सोपे होते.

 

चिंचेचे फळ

कच्ची चिंच जेवढी पित्त वाढवते तेवढ्या प्रमाणात पिकलेली चिंच वाढवत नाही. पाणीपुरी, वडापाव या पदार्थांसाठी चिंचेच्या कोळाचा वापर करतात.

  • तोंडास घाण वास येणे, जिभेवर साका जमणे, तोंडाला चव न जाणवणे यासाठी चिंच व सैंधव मिठाची चटणी खावी.
  • अजीर्ण झाल्यामुळे मळमळ होणे, उलट्या होणे, तसेच पित्ताची तीक्ष्ण जळजळ यासाठी सैन्धवाबरोबर चिंच खावी, अतिशय चांगला लाभ होतो.
  • पोटात वायू धरणे, जास्त घाम येऊन घाबरल्यासारखे होणे इ मध्ये सुद्धा चिंचेचा अतिशय चांगला उपयोग होतो.
  • दारू, भांग, धोत्रा इ विषद्रव्यांच्या दुष्परिणामावर चिंचेची गुळामधील चटणी उपयोगी येते.
  • मेद कमी करण्यासाठी सुद्धा चिंचेचा वापर करता येतो.
  • अन्नपचन नीट होण्यासाठी तसेच पोटात वायू भरत असल्यास अर्ध पिकलेली चिंच भाजून खावी म्हणजे फायदा होतो.
  • नेहमी मलावरोधाची ( पोट साफ न होण्याची ) तक्रार असणार्यांनी चिंचेचे साखरेतील सरबत घ्यावे. म्हणजे जुनाट सवय असल्यास सुद्धा ती बरी होण्यास मदत होते.

चिंचेची पाने

चिंचेच्या पानांची चव तुरट आंबट अशी असते.

  • चिंचेच्या पानांचे पोटीस सूज कमी करण्यास मदत करते.
  • डोळ्याच्या सुजेतही याचा वापर वैद्याच्या सल्याने करावा.
  • सांदेदुखीसाठी चिंचेच्या पानांचे पोटीस गरम करून बांधल्यास उत्तम प्रकारे वेदना कमी करण्याचे काम करते.
  • मुळव्याध या रोगामध्ये सुद्धा चिंचेच्या पानांची पुरचुंडी गरम करून बांधावी म्हणजे वेदना कमी होण्यास मदत होते.
  • घसा दुखत असल्यास पानांचा काढा करून सैंधव घालून त्याच्या गुळण्या कराव्या म्हणजे घश्याची सूज कमी होऊन आराम वाटतो.
  • पानाच्या रसाचा फायदा आव पडत असल्यास होतो.
  • जखमेमधून घाण वास येणे, त्याचे रंग वेगळेवेगळे दिसणे यामध्ये चिंचेच्या पानांची राख टाकावी, याने ती जखम कमी होण्यास मदत होते.

चिंचेची साल

  • चिंचेच्या सालीचा क्षार करून घेऊन तो कोमट पाण्याबरोबर घेतल्यास पोटदुखी कमी होण्यास मदत होते.
  • बाळांतीणीस योग्य दुध येण्यासाठी चिंचेच्या आतील हिरवट सालीच्या रसाचा उपयोग होतो.

चिंचेचे बी ( चिंचोका )

  • मुत्रामधून धातू जाण्याच्या तक्रारीमध्ये यांचा वापर करता येतो.
  • तसेच स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरे जाण्याच्या सवयीसाठी सुद्धा याचा उपयोग होतो.
  • मुळव्याधीचा त्रासही याने कमी होतो.

सावधानता

  • चिंचेचा अति वापर नुकसानकारक ठरतो. पित्त वाढून त्याचे रोग उत्पन्न होण्यासारखे परिणाम उद्भवू शकतात.
  • चिंचेच्या झाडाखाली नेहमी बसू नये याने शीतपित्त,डोळे जळजळणे इ तक्रारी उद्भवू शकतात.
  • शक्यतो दातांनी तोडून, चावून चिंच खावू नये यामुळे दातांना हानी पोचण्याची शक्यता असते. दात ठिसूळ होऊ शकतात.
  • पित्तप्रकोप झाल्यास, पित्ताचे विकार असल्यास चिंचेचा वापर टाळावा.
  • चिंचेचा अति प्रमाणात वापर करू नये.
  • अंगावर सूज असल्यास चिंच खाऊ नये.
  • सर्दी, खोकला, कफ इ तक्रारींमध्ये सुद्धा चिंचेचा वापर करू नये.

क्रमशः

                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),

                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)

अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594

For more ………
Old articles about vegetables and fruits available

please see the articles on www.amrutaayurved.in

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center

Contact – 9869105594

For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in

All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594

For more informative Ayurveda articles –

www.amrutaayurved.in

http://amrutaayurvedthane.blogspot.in

https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter