चहाचे दुष्परिणाम (Side Effects of Tea)
१. दिवसाला जास्ती प्रमाणात, अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात.
२. भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.
३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ(शौचास अवरोध), तहान, पक्षाघातासारखे वातविकार आणि शुक्राणूंची संख्या अल्प होणे, असे विकार बळावतात.
४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.
५. टपरीवर चहा अॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.
६. अति प्रमाणात चहा प्यायल्याने या व्यसनावर खर्च होणारा पैसाही इतर व्यसनांप्रमाणे वायाच जातो
७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील (थंड नसलेल्या) देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही, फार प्यायचे पेय नाही.
८. चहा चवीला तुरट (astringent) असल्यामुळे तो कालांतराने बद्धकोष्ठता निर्माण करतो. *काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही. हे केवळ सवयीमुळे आणि मानसिक जाणिवेमुळे होते.* काहींना गरम पाणी, काहींना तंबाखू, काहींना सिगारेट, इ शिवाय शौचाला होत नाही, इथे तोंडात घेतलेला पदार्थ लगेच मलाशयात कधीही पोहचत नाही , म्हणून शौच होण्यासाठी आता लगेच घेतलेला कोणताही पदार्थ केवळ उत्तेजना देतो किंवा मानसिकता निर्माण करतो, मूळ मलावरोधाच्या तक्रारीला कधीच घालवू शकत नाही. (त्यासाठी शरीरातील दोषांची शुद्धी, पचनशक्ती सुधारणे व सर्व धातूंना, आतड्यांना बळ देणे हाच योग्य उपाय होय.) कुठलेही व्यसन नेहमी वाईटच असते. म्हणून शौचाचा वेग निर्माण करणे, हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.
९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.
१०. चहासमवेत आपण काही पदार्थ (बिस्कीट, पोळी, पोहे इ) खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क (विरुद्धआहार) आल्यामुळे चहा शरीराला मारक ठरतो.
– डॉ आनंद कुलकर्णी
अमृता आयुर्वेद, ठाणे
8779584840
All Type of Ayurveda treatments for Side Effects, allergies are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –