केसांचे पथ्य
केस निरोगी रहाण्यासाठी काय करावे ?
केसांसाठी पोषक गोष्टी
खारीक, खोबरे, खजूर, अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता, मनुके इ चा वापर अधून – मधून आदलून – बदलून करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
यामध्ये सुद्धा खारीक, खोबरे हे महत्वाचे. तसेच ते अगदी सामान्यात सामान्य माणसालाही उपलब्ध होऊ शकते. भारतीय संस्कृतीत या गोष्टींचे जतन करून ठेवले आहे पण आपल्याला त्यांचे महत्व पटणे महत्वाचे आहे तेव्हाच त्यांचा पुनर्वापर होणे शक्य होईल.
नाचणी – गहू – बाजरीचे पदार्थ यांचा आहारात समावेष करणे.
ऋतुमानानुसार मिळणारी फळे यांचे सेवन करणे.
सहा रसांनी युक्त आहार सेवन करणे.
ताज्या अन्नाचे सेवन करणे ( शिळे अन्न खाऊ नये )
फ्रीजमधील सकाळचे अन्न संध्याकाळी खाऊ नये.
केसांना नियमित तेल लावावे, तेल हे केसांच्या मूळाशी हलके चोळून लावावे त्यामुळे केसांचे स्नेहन होऊन केसांची मुळे घट्ट होऊन केस बळकट होतात. केसांचे गळणे तसेच पिकणे थांबते. ( मात्र तेल हे स्वतःची प्रकृती व केसांची प्रकृती इ आयुर्वेदीय वैदयांकडून तपासून वापरल्यास जास्ती फायदे होतात.)
Ayurvedic Scalp Analysis and Hair testing with modern technologies is available at Amruta Ayurevd Thane
All hair and Skin Treatments are available at Amruta Ayurved
Old articles about vegetables and fruits etc available