केस आणि आत्मविश्वास…….
जुनी म्हण -‘ केसाने गळा कापणे’ , नवी म्हण -‘ केसाने आत्मविश्वास कापणे’.
आपले केस आणि आपला आत्मविश्वास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. सध्या केसांच्या आणि आत्मविश्वास कमी झाल्याने नैराश्य आलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढू लागली आहे. सुंदर केस असलेल्या व्यक्तीकडे पाहिल्यावर आपल्यालाही आनंद मिळतो व त्या व्यक्तीचे मनही सुंदर केसांमुळे सुखावले जाऊन त्या व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. याउलट केस निरोगी नसतील, कमी असतील तर त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावरही ह्या गोष्टीचा परिणाम होतो.
याउलट एखादी व्यक्ती सतत दु:खी असेल,मानसिक आजारांनी ग्रस्त असेल,चिंताग्रस्त असेल तर अशा व्यक्तीचे आपल्या जेवणावर आणि इतर गोष्टींवर लक्ष नसते. योग्य आहार न घेतल्याने व चिंता आणि इतर कारणांमुळे स्रोतसांची दुष्टी झाल्याने पचनशक्ती कमी होते. त्यामुळे योग्य आहार घेऊनसुद्धा व्यवस्थित पचन न झाल्याने शरीराचे पोषण योग्य प्रकारे होत नाही. योग्य पोषण न मिळाल्यामुळे हळूहळू केस गळू लागतात व केसांचे विकार सुरु होतात.
अशा प्रकारे केस आणि आत्मविश्वास यांचा परस्पर संबंध आहे. त्यामुळे गेलेल्या केसांबरोबर पुन्हा गेलेला आत्मविश्वाससुद्धा मिळावा … फक्त आयुर्वेद उपचारांनीच……!!!
– केशायुर्वेद वरून साभार
All hair and Skin Treatments are available at Amruta Ayurved
Old articles about vegetables and fruits etc available