काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
भाजी ( Vegetables ) – भाग १
भाज्यांबद्दल खूप समज – गैरसमज समाजामध्ये आपणास पहावयास मिळतात. कारण अमका एक सांगतो, दुसरा दुसरेच सांगतो व तिसरा तिसरेच सांगतो, कोणी म्हणतो व्हिटामिन्स भरपूर मिळतात, कोणी म्हणतो फायबर जास्त प्रमाणात मिळतात तर कोणी म्हणतो पोषणमुल्ये भरपूर प्रमाणात मिळतात आणि म्हणून भाज्या भरपूर खा.
पण साधा विचार आहे जी वस्तू / पदार्थ कमी दिवसात तयार ( शेतामध्ये ) होतात, कमी दिवस जगतात, जिला टिकवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात, ती वस्तू तुम्हाला कसे काय आरोग्य / दीर्घायुष्य देऊ शकते ? आयुर्वेदाचा एक सामान्य सिद्धांत ( नियम ) आहे कि समानाने समानाची वृद्धी होते, वाढ होते. जसे – बाळंतिणीला दुध प्याल्याने स्तनात दुध येण्यास मदत होते, मांस खाल्याने मांस वाढते, साखर जास्त खाल्याने साखर वाढते अशी अनेक उदाहरणे आहेत कि जी ‘ समानाने समानाची वाढ ’ या तत्वाला आधार देणारी आपण नेहमी पहातो. मान्य आहे कि भाज्यांमधून फायबर मिळतात पण काय फक्त भाज्यांमधूनच फायबर मिळतात, इतर गोष्टींमध्ये फायबर नसतात? हा केवळ मूर्खपणा आणि केवळ एकाच गोष्टीचा अतिरेक केल्यासारखे आहे.
मुळात आयुर्वेदानुसार भाज्या कमी खाव्यात. जुन्या काळी आठवत असेल तर आजारी माणसाला भाज्या कमी किंवा दिल्या जात नसत. उलट तूप – मीठ – भात, तूप – मीठ – भाकरी, मेतकुट इ. पदार्थ दिले जायचे, अजूनही देतात. भाज्यांपेक्षा वरील हलके व भूक वाढवणारे पदार्थ आजारपणात चांगले. बरं याही घटकातून फायबर मिळतातच. ( पण आजकाल आटा बाजारातून विकत घेतला जातो ना, मैदयाचे पदार्थ जास्त खाल्ले जातात, हॉटेलचे – बाहेरचे जास्त खाल्ले जाते मग हॉटेलवाले स्वस्त मैदयापेक्षा कशाला त्या फायबर असलेल्या पिठाच्या वस्तू , पदार्थ तुम्हाला पुरवतील. )
जी वस्तू, जो पदार्थ तयार ( शेतामध्ये ) व्हायला जास्त वेळ लागतो, जी वस्तू / पदार्थ जास्त दिवस टिकतो ( धान्य, ज्वारी, गहू, डाळी इ. ) तेच तुम्हाला जास्त काल टिकवू शकतात. शरीरात गेल्यावर त्यांचे परिणाम दीर्घकाळ शरीरात रहातात. म्हणून नेहमी वापरायच्या ( धान्य ) व कधीकधी वापरायच्या ( भाज्या, लोणचे, पापड इ. ) गोष्टींमध्ये फरक असतो.
पण म्हणजे मग भाज्या खाऊच नयेत का ? तर तसे नाही, भाज्या खाव्यात पण कारणाशिवाय व विचार न करता, अतिरेकाने, चुकीच्या पद्धतीने केलेल्या अश्या भाज्या टाळणे जास्त चांगले.
– क्रमशः
For more ………
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchakarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –