उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda
सामान्यपणे शरीरातील उष्णता ( गरमी ) वाढल्याने होणारे रोग खालीलप्रमाणे नोंद करता येतील. ज्वर /ताप, अंग गरम वाटणे, कणकण, उन्हाळी, दाह, हातापायांची आग, हृदयात आग –जळजळ, डोळ्यांची आग, त्वचेवर फोड, मुरूम, पुटकुळ्या, घामोळ्या, डोळे लाल होणे, त्वचा लाल होणे, हातापायांच्या तळव्यांना जास्ती घाम येणे, नागीण, नाकातून रक्त येणे, तोंडातून रक्त येणे, कानातून रक्त येणे, गुदामार्गातून रक्त येणे, मूत्रमार्गातून रक्त येणे, मेंदूत रक्तस्राव, त्वचेखाली रक्तस्राव, कावीळ, अंगास अति घाम येणे, तोंड येणे, तृष्णा ( तहान जास्ती लागणे ) हे व इतरही अनेक असे शरीरातील उष्णता वाढल्याने होणारे रोग आपण नेहमी पाहतो. शरीरात अशी उष्णता राहून पुढे कॅन्सरपर्यंतचे गंभीर विकार होऊ शकतात.
उष्णता वाढण्यास कारणे –
शरीरातील उष्णता वाढण्यास कारण होणाऱ्या गोष्टींपैकी काही खालीलप्रमाणे आपण पाहू –
अतिशय उष्ण ( गरम गरम ) खाणे, अतिशय तीक्ष्ण ( झणझणीत ) खाणे, अतिशय तिखट ( नेहमीच हिरवी मिरची, तिखट मसाला इ जास्ती वापर करून ) खाणे ( गरज नसताना चव म्हणून तिखट भाजीत तिखट चटणी मुद्दाम टाकून खाणे ), जास्त प्रमाणात खारट ( salty ) खाणे, ( उदा. खारवलेले शेंगदाणे, खारवलेल्या मुग – तूर इ दाळी, खारवलेले मासे इत्यादी. ), विदाही पदार्थ ( म्हणजे वरीलपैकी चवीचे नसून सुद्धा पोटात आतमध्ये गेल्यावर ज्यांच्यामुळे एक प्रकारचा दाह निर्माण होतो , आग जाणवते, गरम वाटते तसेच पचनाच्या अंतिम क्षणी ज्यांचा परिणाम उष्ण / तिखट होईल असे पदार्थ, वारंवार तळलेले तेल, वारंवार गरम केलेले पदार्थ इत्यादी. ), पित्तकर पदार्थ खाण्याने ( असे बरेच पदार्थ वर्णन करता येतील पण साधारणपणे आपल्याला माहित असते कि हा पदार्थ खाल्याने माझे पित्त वाढते , मला त्रास होतो असे पदार्थ खाणे इत्यादी ), अतिशय रुक्ष म्हणजे कोरडे व तेही अतिप्रमाणात खाणे, अतिशय आंबट गोष्टी अति प्रमाणात खाणे ( जरी लिंबू शीत / थंड असले तरी आम्बटपणामुळे, थंड पणामुळे रोधास मदत नक्कीच करू शकतात. ), जास्त तीळ खाल्याने, अग्नी / भूक मंद झाल्याने ( भूक कमी लागत असताना जास्त खाण्याने ), मालाचा संचय किवा खडा झाल्याने ( मलावष्टंभ ), अतिमैथून केल्याने ( दोषांचा समतोल, धातूंचा समतोल बिघडून ), नैसर्गिक वेग ( माल, मूत्र, शिंका, उलटी इ. ) रोखल्याने, ते रोखण्यासाठी औषध घेतल्याने ( जसे स्त्रियांच्या पाळीचे – पाळी येऊ नये म्हणून काही औषधे घेणे इ. ), तापाचा योग्य निचरा न झाल्याने ( ताप अंगात मुरल्याने ), अतिशय जागरण केल्याने, अतिशय व्यायाम / कष्ट करूनही त्याला साजेसा आहार न घेण्याने ( अप्रत्यक्षरीत्या ) इत्यादी व उल्लेख न केलेल्या इतरही अनेक कारणांनी शरीरातील उष्णता- हिट ही वाढते व अनेक रोग निर्माण करत असते.
And much more……9869105594 , https://amrutaayurved.in/
Old articles available