आहाराचे प्रमाण आणि आयुर्वेद

नेहमी मिताहारी असावे

मात्राशी सर्वकालं स्यान्मात्रा ह्यग्नेः प्रवर्तिका। 
मात्रां द्रव्याण्यपेक्षन्ते गुरूण्यपि लघून्यपि ।। …. वाग्भटाचार्य 

सर्वकाळ मात्रावत खावे. आणि मात्रा ( प्रमाण ) ही द्रव्याच्या ( अन्नपदार्थच्या ) अपेक्षेने ठरवावी लागते.

कमी खाऊन जसे पोषण होत नाही, तसे जास्त खाऊनही पोषण होत नाही. अन्न पचले तरच पोषण होते. प्रत्येकाने आपली प्रकृती ओळखून, सप्तधातूंच्या पोषणाची योजना आखून, अग्नीचा विचार करून अर्धे पोट भरेल एवढाच म्हणजे मिताहार करावा.

मिताहार अग्नी प्रदीप्त करतो. अन्न जड असो वा हलके ते मित ( थोड्या – पचेल एवढ्या ) प्रमाणातच घेतले पाहिजे.

म्हणूनच सर्वदा मिताहारी असावे.