अस्थिसौषिर्य (हाडे ठिसूळ होणे) (Osteoporosis)
अस्थिसौषिर्य (हाडे ठिसूळ होणे) (Osteoporosis)
आजकालचा बहुचर्चित विषय म्हणजे अस्थिसौषिर्य.
अस्थिसौषिर्य म्हणजे काय?
– सर्वसाधारणपणे हाडे ठिसूळ होणे म्हणजे अस्थिसौषिर्य होय.
आजकाल हा आजार calcium deficiency मूळे लहान मुले, तरुण स्त्री – पुरुष अशा लहान वयामध्येही प्रकर्षाने दिसत आहे.
या रोगामध्ये हाडाचे वजन कमी होते, हाडाच्या सूक्ष्म रचनेमध्ये विघटनात्मक बदल (degenerative changes) होऊन *फ्रॅक्चर (fracture) होण्याची शक्यता वाढते*
वयोमानानुसार तसेच पोषणाचा अभाव, अतिविकसित जीवनशैली, calcium deficiency, सूर्याचे ऊन न लागणे, व्यायाम न करणे अशी काही कारणे या व्याधिस कारणीभूत असतात.
आयुर्वेदानुसार *प्रकुपित वातामुळे* हाडे ठिसूळ होऊन अस्थिभंग ( फ्रॅक्चर) होण्याची शक्यता वाढते.
अस्थिसौषिर्य याचा परिणाम / लक्षणे –
– अस्थिभंग (फ्रॅक्चर) भरण्यास (बरा होण्यास ) विलंब लागतो, हाडे जुळून येण्यास बराच काळ लागतो
– वृद्धापकाळामध्ये अस्थि पोषण व अस्थि (हाडे) तयार होण्याच्या , भरण्याच्या प्रक्रियेत बिघाड होतो
– spinal cord disorders( पाठीच्या मणक्याची विकृती), वेदनारहित मणक्यांचे फ्रॅक्चर इ हाडांच्या विकृती होतात
– पायांचे बाह्य परिवर्तन व त्यांची लांबी कमी होण्याची शक्यता अधिक असते
– विशेषतः स्त्रियांमध्ये कमरेच्या हाडांचा अस्थिभंग होण्याचा धोका असतो
इ हाडांसबंधीत विकार उद्भवतात
अस्थिसौषिर्यावर आयुर्वेदानुसार उपाय –
प्रतिबंधात्मक उपाय
– आयुर्वेदीय रसायन प्रयोग
– कमी वयापासूनच जीवनशैलीत योग्य बदल करणे
– संपूर्ण शरीराची नियमित मालिश / वातशामक अशा औषधी तेलाने अभ्यंग करणे
– आयुर्वेदातील वातनाशक पंचकर्मे जसे बस्ति, स्नेहन स्वेदन, स्थानिक बस्ती इ योग्य पद्धतीने करून घ्यावीत
– योगाभ्यास करावा
– वजन नियंत्रणात ठेवावे, जास्ती असल्यास कमी करावे
– दूध, नाचणी, नारळ, खारीक इ पदार्थ आवर्जून घ्यावेत
– शिग्रु म्हणजे शेवग्याच्या शेंगा आहारात जरूर घ्याव्या
– शिळे, कोरडे पदार्थ खाऊ नयेत
– खारट पदार्थ खाणे टाळावे
– अति व्यायाम, अतिश्रम करू नये
– मद्यपान , धूम्रपान टाळावे
– अतिप्रमाणात कॉफी पिऊ नये
– शरीरशुद्धी कधीही न करणे, हे टाळावे
– शरीरात दोष साठून , त्यांची विकृती होऊन हाडांना त्रास होणार नाही असे पाहावे.
– डॉ आनंद कुलकर्णी
अमृता आयुर्वेद, ठाणे
8779584840
अमृता आयुर्वेदची Website – *www.amrutaayurved.in*
Facebook page – https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter/
आयुर्वेद माहितीपर लेखांसाठी ग्रुप ची लिंक खालील प्रमाणे
*Link for Joining the group for Ayurved Tips*
https://chat.whatsapp.com/BnqJF44r3TPHgj5LjNoCSf