कायकिती व का घ्यावे आयुर्वेदानुसार शंका समाधान

फलवर्ग 

फळे ( Fruits ) भाग 23

फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.

बोर

बोराची झाडे ही सर्व भारतभर पाहायला मिळतात. याचे वेगेवेगळे पाच प्रकार आढळतात. बोर हे फळ ऋतुमानानुसार मिळणारे फळ आहे. म्हणून बोरे ही सुकवून वापरण्याची पद्धत आपल्याकडे आहे. जेव्हा ताजी फळे नसतील तेव्हा ही सुकवून ठेवलेली फळे वापरता येतात. बरेच लोक याचा भाजी किंवा आमटीमध्ये आमसुलाप्रमाणे वापर करतात.

बोराचे फळ

  • छोटी व मध्यम आकाराची बोरे हि कच्च असताना पित्त व कफ वाढवतात. आणि ती पिकल्यावर पित्त व वाताला वाढवतात.
  • अंगावर पित्ताच्या गांधी येणे यासाठी बोराचा कल्क बाहेरून लावल्यास खाज कमी होते.
  • सारखी तहान लागणे, घसा, जीभ इ कोरडे पडणे यासाठी पिकलेली व गोड अशी बोरे खावीत.
  • उगाचच येणारा थकवा हा आंबट गोड बोरे खाण्याने कमी होतो.
  • वारंवार उचकी लागत असल्यास आंबटगोड बोरे खावी. शक्यतो ताजी बोरे घ्यावीत. बोराचे बी सुद्धा वापरू शकतो, ते बी उगाळून खडीसाखरेबरोबर घ्यावे.
  • कोरडी उलटी होईल असे वाटणे,पोटात जखडल्यासारखे वाटणे, घसा कोरडा पडणे इ साठी बोरे खाण्याने चांगला उपयोग होतो.
  • बोराचे लोणचे देखील काही ठिकाणी पाहायला मिळते. परंतु हे बोराचे लोणचे मळमळ उलटी इ असताना खाऊ नये नाहीतर उलट परिणाम होऊन उलटी थांबत नाही किंवा सुरु होऊ शकते.
  • डोळ्यांच्या विविध तक्रारींमध्ये बोराचे बी उगाळून डोळ्याच्या पापण्यावर लावतात , परंतु येथे तज्ञ वैद्याचा सल्ला आवश्यक आहे.
  • पोट खराब होऊन जुलाब लागल्यास, त्यात भूक न लागणे असे असल्यास सुकवलेल्या बोरांचे कढण घ्यावे.
  • बोरांचा पाण्यातील काढा हा मज्जातन्तुंचा अशक्तपणा कमी करण्यास मदत करतो.

बोराची पाने

  • तापामध्ये सगळ्या अंगाची जी आग होते त्यावर बोराची पाने वाटून त्याचा लेप लावावा.
  • तळहात आणि तळपाय यावर येणारा जास्ती प्रमाणाचा घाम बोराच्या पानांचा रस लावल्यास कमी होण्यास मदत होते.
  • हिरड्यांमधून रक्त येणे, जिभेला चिरा पडणे, वारंवार तोंड येणे या तक्रारींवर बोराच्या पानांचा काढा करून गुळण्या कराव्या म्हणजे लाभ होतो.
  • जखमा धुण्यासाठीही बोराच्या पानांचा काढा पूर्वीच्या काळी वापरला जात असे.
  • बोराची पाने याच्या काढ्याने धुतल्यास कोथ ( अवयव नासणे यासारखे ) लवकर होत नाही. म्हणून कि काय मुस्लिमांमध्ये प्रेतास बोराच्या पानांच्या काढ्याने अंघोळ घालण्याची प्रथा काही ठिकाणी पाहायला मिळते.
  • अंगावर गळू येणे, त्याचा कोथ होणे इ रक्तविकारांमध्ये बोराच्या झाडाची साल याचा काढा करून घ्यावा.

सावधानता

  • बोरे हि कच्ची कधीच खाऊ नयेत.
  • पिकलेली बोरे सुद्धा भरपूर प्रामाणात खाऊ नये आणि जरी खाल्ली तरी त्यावर लगेच पाणी पिऊ नये, याने पोटात दुखू शकते.
  • बोरे खाताना जास्ती मीठ लावून खाऊ नये.
  • डुकराचे मांस व बोरे हे मिश्रण घातक ठरू शकते म्हणून शक्यतो टाळावे.

क्रमशः

                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),

                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)

अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594

For more ………
Old articles about vegetables and fruits available

please see the articles on www.amrutaayurved.in

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center

Contact – 9869105594

For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in

All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594

For more informative Ayurveda articles –

www.amrutaayurved.in

http://amrutaayurvedthane.blogspot.in

https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter